पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेरील गाडे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरत असल्याचा संशय आल्याने तेथील खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे गोमेकॉने नोटीसव्दारे आपल्या कर्मचाऱ्यांना बजावले आहे.
बांबोळी येथील सुपरस्पेशल्टी ब्लॉक तसेच गोमेकॉ इस्पितळाबाहेर अनेक खाद्यपदार्थ विक्री गाडे,दुकाने, कॅंटीन आहेत. गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांसह या इस्पितळात तपासणीसाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या गाडयांवरील हे खाद्यपदार्थ खातात. मात्र आता हे पदार्थ तयार करण्यासाठी उद्यानातील नळाचे अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरले जात असल्याचा संशय आहे.
गोमेकॉच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आली आहे. त्यामुळे गोमेकॉ ने हे खाद्यपदार्थ खाता तसेच तेथील पाणी पिताना खबरदारी घ्यावी असे आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसव्दारे बजावले आहे. उद्यानातील नळाचे पाणी पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सुरक्षित नसल्याचेही यात नमूद केले आहे.