शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

गोव्यात ‘आयुष’ पर्यटनास वाव

By admin | Published: May 02, 2017 4:39 AM

‘आयुष’शी निगडित पर्यटन गोव्यात आकार घेईल, असे यापूर्वी गोवा सरकारलाही वाटत नसताना गोव्याचे खासदार असलेल्या केंद्रीय

सद्गुरू पाटील / पणजी‘आयुष’शी निगडित पर्यटन गोव्यात आकार घेईल, असे यापूर्वी गोवा सरकारलाही वाटत नसताना गोव्याचे खासदार असलेल्या केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुष पर्यटनाला गोव्यात वाव देण्याचे ठरविले आहे. गोव्यात अलीकडील काळात पर्यटनाचे विविध प्रकार विकसित होत आहेत. इको-टुरिझमला गोवा सरकारने वाव दिल्यानंतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प इको-पर्यटन क्षेत्रात येऊ लागले आहेत. गोव्यात आयुष मंत्रालयाने अलीकडे प्रथमच जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले होते. आयुर्वेदिक औषधे, उत्पादने, त्यांचा प्रसार करणे या हेतूने हे प्रदर्शन भरविले गेले व गोव्यातील हजारो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. गोव्यातील धारगळ येथे आयुष मंत्रालयाकडून ५० खाटांचे इस्पितळ उभे केले जाणार आहे. गोव्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच इस्पितळ असेल. त्यासाठी भू-संपादनही झालेले आहे. प्रकल्पाचा तपशील ठरविण्यासाठी राज्य सरकारकडून आयुष मंत्रालयाशी बोलणी केली जात आहेत. आयुर्वेद, होमिओपथी, युनानी, योगा अशा विविध पद्धतींशी निगडित उपचार धारगळमधील इस्पितळात उपलब्ध असतील.गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. त्यात पंधरा लाख विदेशी पर्यटकांचा समावेश असतो. विदेशी पर्यटकांचा ओढा हा योग आणि आयुर्र्वेदाकडे वाढला आहे. गोव्याच्या किनारपट्टीत विदेशी पर्यटकांना योगाचे प्रशिक्षण देणारी किमान ५० केंद्रे गेल्या पाच वर्षांत उभी राहिली आहेत. काही विदेशी पर्यटक स्वत:ही योगाचे प्रशिक्षक बनले आहेत. विदेशी पर्यटक विविध प्रकारच्या व्याधींवर गोव्यात आयुर्र्वेदिक उपचार करून घेतानाही आढळून येतात.पर्यटनमंत्री बाबू आजगावकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की गोव्यात सर्वच प्रकारचे पर्यटन यापुढील काळात वाढणार आहे. एकेवेळी गोव्याला केवळ १५ लाख पर्यटक भेट द्यायचे. गोव्यात साहसी, पर्यावरणविषयक व आध्यात्मिक अशा प्रकारच्या पर्यटनाचे प्रकार १५ वर्षांपूर्वी विकसित झाले नव्हते. आता आयुषविषयक पर्यटनही विकसित होईल.आयुष पर्यटन विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गोव्यात नेचोरपथी संस्थाही उभी केली जाईल. आयुष पर्यटन हे वैद्यकीय पर्यटनाच्याच हातात हात घालून पुढे जाईल. गोवा ही आयुष पर्यटनासाठी अनुकूल अशी भूमी आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा आम्ही उपलब्ध करण्याचे प्राथमिक काम सुरू केले आहे.- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्री