पणजी : बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमधून झालेली हकालपट्टी स्वागतार्हच असून काँग्रेसची प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. मोन्सेरात यांना २००२ साली सर्वप्रथम फालेरो यांनीच काँग्रेसचे तिकीट नाकारून त्यांची जागा दाखवून दिली होती. फालेरो आणि मोन्सेरात यांच्यातील तेरा वर्षांच्या वादास वैयक्तिक द्वेषाची किनार लाभली आहे. हे शत्रुत्व आता राजकीयदृष्ट्या बाबूश यांच्या मुळावर येऊ लागले आहे. २००२ साली मोन्सेरात गोव्याच्या, ताळगावच्या राजकारणातही कुणीच नव्हते. ते फ्रान्सिस सार्दिन, सोमनाथ जुवारकर अशा काही मोजक्याच राजकारण्यांच्या अगदी जवळ होते. काही राजकारण्यांचे ते फायनान्सर आहेत, अशीही त्या वेळी चर्चा होती. सावकारी पद्धतीने व्याजाने पैसे देण्याचा धंदा ते अधिकृतरीत्या करतच होते. जुवारकर यांच्याशी त्यांचे २००२च्या काळात बिनसले व त्यांनी २००२ साली प्रथमच ताळगावमधून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्या वेळी फालेरो हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. (पान २ वर)
बाबूश कायमच राहिले लुईझिनच्या हिटलिस्टवर
By admin | Published: March 13, 2015 12:52 AM