वास्को: पणजी, मडगाव, कोलवा इत्यादी ठीकाण्यातून लोकांचे मोबाईल चोरी करणारा सराईत मोबाईल चोर यूसुफ शेख (वय ४८, रा: दावणगीरी) याला वास्को पोलीसांनी बस स्थानकाकडून ताब्यात घेऊन अटक केली. बस स्थानका जवळ एक व्यक्ती संशयास्पद फीरत असल्याने पोलीसांनी त्याला अडवून त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यातून युसूफने चोरलेले ९ मोबाईल आढळले. पोलीसांनी यूसुफने चोरलेले दीड लाखाचे ते ९ मोबाईल जप्त करून त्याला अटक केली.
शुक्रवारी (दि.१५) सकाळी वास्को पोलीस गस्तीवर असताना त्यांना बस स्थानकाजवळ एक इसम संशयास्पद फीरताना आढळून आला. पोलीसांनी लगेच त्याला तपासणीसाठी अडवून प्रश्न केले असता त्यांची तो योग्य उत्तरे देत नसल्याने पोलीसांचा संशय वाढला. त्या व्यक्तीच्या हातात असलेल्या बॅगची पोलीसांनी तपासणी केली असता त्यातून त्यांना ९ मोबाईल आढळून आले. पोलीसांनी त्या ९ मोबाईलबाबत त्याला प्रश्न केले असता त्यांने योग्य उत्तरे दिली नसल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकावर नेला. तेथे पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता ते ९ मोबाईल त्यांने चोरल्याची कबूली पोलीसांसमोर केली.
पोलीस निरीक्षक कपील नायक यांना अधिक माहीतीसाठी संपर्क केला असता ९ चोरीच्या मोबाईलसहीत पकडलेल्या त्या चोरट्याचे नाव युसूफ शेख असल्याची माहीती त्यांनी दिली. युसूफ सराईत मोबाईल चोर असून गेल्यावर्षी त्याला मुरगाव पोलीसांनी २० चोरीच्या मोबाईलसहीत अटक केला होता अशी माहीती दिली. बुधवारी युसूफला अटक करून त्याच्याकडून जप्त केलेल्या त्या ९ चोरीच्या मोबाईलची कीमत सुमारे दीड लाख रुपये असल्याची माहीती नायक यांनी दिली.
पणजी, मडगाव, कोलवा इत्यादी भागातून युसूफ ने लोकांचे ते मोबाईल चोरी केले होते अशी माहीती चौकशीत उघड झाल्याचे निरीक्षक नायक यांनी सांगितले. गोव्यात पर्यटक हंगामा सुरू होण्याबरोबरच नवीन वर्ष जवळ येत असल्याने विविध भागात पार्टी, कार्यक्रमांना सुरवात झालेली आहे. ह्या काळात गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी - विदेशी पर्यटक येत असल्याने युसूफ दावणगीरी, कर्नाटक येथून गोव्यात मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता असे चौकशीत स