नारायण गावस,पणजी: राज्यात सध्या अपघातांची मालीका सुरु असून वर्ष समाप्तीला अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत. आता डिसेंबर सुरु होताच ४ जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहेत. आता नवीन वर्ष सुरुवात हाेणार असल्याने राज्यात पर्यटकांची संख्याही वाढली अनेक पार्ट्या महोत्सव सुरु असल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने दारुच्या नशेत गाड्या हाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालविताना अती घाई न करता संयम बाळगणे गरजेचे आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ-
राज्यात नाेव्हेबर, डिसेबर व जानेवारी या तीन महिन्यात दुप्पट पर्यटक दाखल होत असतात. रेंट अ बाईक व रेंट अ कारच्या गाड्या घेऊन राज्याची भृमंती करतात. पण अनेक पर्यटक हे रस्त्यावरील नियमांचे पालन करत नाही. दारुच्या नशेत गाड्या भरवेगाने चालवितात. रस्त्यावर लावलेल्या वाहतूक फलकावरील नियमांचे पालन करत नाहीत. पर्यटकांच्या मौजमजेमुळे ते स्वत:चा जीव घालवतात पण इतर निरअपराधी लोकांचाही बळी घेतात. त्यामुळे सध्या रस्त्यावर वाहतूक चालविताना आपण स्वाताहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील वाहनांमध्ये वाढ -
राज्यात अनेक महोत्सव व पार्ट्या होत असल्याने अनेक देशी विदेशी पर्यटक गोव्यात येत आहेत. देशभरातून गाड्या राज्यात दाखल होत आहेत. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ तसेच प्रमुख रस्त्यावर गाड्या चालविण्यासाठी जागाही नसते. माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत असते. वाहतूक पाेलीसांची कमतरता असल्याने असे जे नियम ताेडतात त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. हे दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.