शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

लाखाच्या मताधिक्क्यासाठी श्रीपाद नाईक अन् रमाकांत खलप यांच्यात कडवी झुंज

By किशोर कुबल | Updated: May 2, 2024 13:44 IST

श्रीपाद नाईक यांचे डबल हॅटट्रिकचे लक्ष्य साध्य होणार? खलपांचाही जोरदार प्रचार

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात यावेळी एक लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होण्याचा संकल्प भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सोडला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीसाठी उशिरा उमेदवार जाहीर केला असला तरी खलप अनेक भागांमध्ये पोहचले आहेत. तेथे त्यांनाही श्रीपाद यांच्याप्रमाणेच लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. सांताक्रुझ मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल दिसत आहे. कळंगुट मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत लोक वेगळी भूमिका घेतात, असे यापूर्वीही दिसून आले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार भाजपचा असताना येथे काँग्रेस उमेदवाराला जास्त मते मिळाली होती. श्रीपाद नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर १९९९ पासून सलग पाचवेळा उत्तर गोव्याची जागा जिंकण्यात यश मिळवले आहे. मात्र, दक्षिण गोव्याची जागा ही भाजपसाठी नेहमीच उलथापालथ करणारी ठरली आहे. श्रीपाद यांनी केंद्रात आयुषमंत्री, जहाजोद्योग राज्यमंत्री, पर्यटन राज्यमंत्री म्हणून पदे भूषवली आहेत. सध्याही ते पर्यटन राज्यमंत्री असून सहाव्यांदा रिंगणात आहेत. यावेळी 'डबल हॅटट्रिक करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

एनडीएतील घटक पक्ष मगोपचे ज्येष्ठ आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही मंगळवारी एनडीएच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्रीपाद हे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून येतील, असा दावा केला आहे.

श्रीपाद नाईक हे त्यांचे साधी राहणीमान स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कळंगुट विधानसभा मतदारसंघ वगळता उत्तर गोव्यातील १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी राखली होती. श्रीपाद हे १,०५,५९९ इतक्या मताधिक्क्याने जिंकले होते. त्यांना २,३७,९०३ (४६.१६ टक्के) मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक यांना १,३२,३०४ (२५.६७ टक्के) मते प्राप्त झाली होती. आपचे दत्ताराम देसाई हे त्यावेळी १५,८५७ (३.०८ टक्के) मते मिळवून तिसन्या स्थानी आले होते. तेव्हा ४,०६,६३१ जणांनी मतदान केले होते. एकूण ७८.८९ टक्के मतदान झाले होते.

२०१९ च्या निवडणुकीत पुन्हा श्रीपादच निवडून आले परंतु त्यांचे मताधिक्वय कमी झाले. या निवडणुकीत ते ८०,२४७ मतांच्या फरकाने निवडून आले. श्रीपाद यांना २,४४,८४४ (५७.०७ टक्के) तर काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १,६९,५९७ (३८.३७ टक्के) मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ७६.१९ टक्के मतदान झाले होते. एका आकडेवारीवर लक्ष टाकले असताआणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. २०१४ साली भाजपचा मतांचा वाटा ४६.१६ टक्के होता. २०१९ साली तो वाढून ५७.०७ टक्क्यांवर पोचला. काँग्रेसचा मतांचा वाटा २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा मतांचा वाटा २५.६७ टक्के होता. २०१९ च्या निवडणुकीत तो वाढून ३८.३७ टक्के झाला.

२००९ मध्ये देशप्रभूचा विजय होता समीप

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युती होती. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला दिली होती. उत्तर गोव्यात राष्ट्रवादीने जितेंद्र देशप्रभू यांना तिकीट दिले होते. या सार्वत्रिक निवडणुकीत देशप्रभू हे विजयाच्या समीप आले होते. श्रीपाद त्यावेळी केवळ ६,३५३ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांना १,३७,७१६ तर देशप्रभू यांना १,३१,३६३ मते मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसने आता खलप यांच्या रुपाने तुल्यबळ उमेदवार दिलेला आहे. इंडिया आघाडीत काँग्रेससोबत गोवा फॉरवर्ड, आप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) आदी पक्ष आहेत. त्यामुळे श्रीपाद यांना मोठ्या मताधिक्क्याचे इप्सित गाठण्यास पुढील पाच दिवसात अधिक मेहनत घ्यावी लागेल. दरम्यान, श्रीपाद यांची जमेची बाजू म्हणून सत्तरीत नेहमीच त्यांना मिळणारी ३० ते ३५ हजार मतांची आघाडी होय. यावेळीही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच पर्येच्या आमदार डॉ, दिव्या राणे यांनी सत्तरी तालुक्यात भक्कमपणे साथ दिल्याने तेथे भाजप अधिक प्रबळ वाटतो. श्रीपाद यांच्यासाठी सत्तरीमुळेच उत्तरेची जागा सुरक्षित मानली जाते. भाजपची मजबूत संघटनात्मक मांडणी आहे.

२०१९ मध्ये चौघांना 'नोटा'पेक्षाही कमी मते

इतर नकाराधिकार बजावणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५,७७० मतदारांनी 'नोटा'ची कळ दाबली. हे प्रमाण १.१२ टक्के होते. २०१९ च्या निवडणुकीत ७,०६३ मतदारांनी नकाराधिकार बजावला. 'नोटाच्या मतांचे हे प्रमाण १.६५ टक्के होते आणि विशेष म्हणजे या निवड- णुकीत आपचे उमेदवार प्रदीप पाडगां- वकर, आरपीआयचे उमेदवार अमित कोरगांवकर तसेच भगवंत कामत व ऐश्वर्या साळगांवकर या अपक्ष उमेद- वारांना 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली होती.

खलपांकडे दुर्लक्ष कसे करणार? : राजकीय विश्लेषक

एका राजकीय विश्लेषकाच्या मते उत्तरेत खलप यांच्याकडे तसे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भाजपकडे संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे श्रीपाद यांची मते तशी कमी होणार नाहीत. एक लाखाहून अधिक वगैरे मताधिक्क्य गाठणे तसेच कठीणच दिसते. २००९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी युतीने विजय समीप आणला होता हे विसरुन चालणार नाही, देशप्रभू यांनी आणखी जोर लावला असता तर ते कदाचित निवडूनही आले असते. त्यावेळी विश्वजित काँग्रेससोबत होते. हादेखील फॅक्टर नाकारुन चालणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाnorth-goa-pcउत्तर गोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४