नारायण गावस
पणजी: विरोधी पक्षांचे नेते सध्या देशभर सनातन धर्मंविरोधात प्रचार करत आहे. भारत जाेडोची यात्रा करणारी कॉग्रेस पक्ष आता भारत ताेडो भाषा करत आहे. कॉग्रेस, डीएमके तसेच अन्य पक्षांनी सनातन विरोधी केलेल्या वक्तव्याचा आम्ही गाेवा भाजपतर्फे निषेध करतो, असे भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप गांवकर उपस्थित होते.तामीळनाडुच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातन धर्माविरोधात विविध अपशकून बाेलले आहे. देशभर बहुसंख्य लाेक हे सनातन धर्म मानत आहे. त्यामुळे त्यांनी आपले हे वक्तव्य मागे घेणे गरजेचे आहे. फक्त धार्मक राजकारण करु नये. त्यांना बोलता धनी हा कॉग्रेस आहे. कॉँग्रेसने या विरोधी पक्षांना भाजपविरोधात भडकाविण्यासाठी असे हिंदुविराेधी विधाने करायला सांगितले आहे, असे गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले.
भाजप हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. कुठच्या धर्मावर भाजप बाेलत नाही विरोधकांनी येणऱ्या निवडणूकीत बाेलण्यासाठी मुद्दे नसल्याने असे धर्मावर बोलले जात आहे. डिएमके नेत्याना आपल्या राज्यातीली निवडणूकीवेळी हिंदु धर्म दिसतो आता धर्मावर बाेलताना त्यांना सनातन धर्म दिसत नाही. या विषयी सर्व विरोधी पक्षांनी स्पष्टीकरण द्यावे, असे पै वेर्णेकर म्हणाले.