भाजप ओबीसीविरोधी पक्ष; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 08:52 AM2023-04-06T08:52:28+5:302023-04-06T08:53:55+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील ८ आमदारांना भाजपत प्रवेश देण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
काँग्रेसमधून भाजपत गेलेले मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर यासारख्या मोठ्या नेत्यांना पक्षात काही काम नसल्याने त्यांच्या प्रवेशापासून ते आतापर्यंत दिसून आले आहे. भाजपतील ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना पक्षाकडून मिळत असलेली वागणूक जगजाहीर असल्याने या पक्षाने ओबीसी संपवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केली.
गेल्या आठवड्यात भाजपतील काही नेत्यांनी म्हापशात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची स्तुती करताना या स्तुती आडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना चोडणकर यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान कशा पद्धतीने केला हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप हा आरएसएसच्या दबावाखाली वागत असून ओबीसी समाजाविरोधात वागणारी आरएसएस ही संघटना असल्याचाही आरोप चोडणकर यांनी यावेळी बोलताना केला.
काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर टीका करताना भाजपने वेळोवेळी ओबीसींवर खोटे प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे.
- देशात काँग्रेसमुळे आरक्षण लागू झाले असून आरक्षणाद्वारे समानता लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. उलट भाजपला आरक्षणविरोधी असलेला पक्ष असून त्यांना आरक्षण लागू करण्याची इच्छा असती, तर गोवा विद्यापीठ, गोवा वैद्यकीय महाविद्यालय दंत महाविद्यालयासारख्या ठिकाणी आरक्षण लागू केले असते, असेही गिरीश चोडणकर यांनी निदर्शनाला आणून दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"