शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
2
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
3
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
4
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
5
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

विरोधक गारद होताना भाजप मात्र लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 11:34 AM

देशातील काही प्रादेशिक पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

- सद्गुरु पाटील

लोकसभा निवडणूक जर भाजपने सहा महिने अगोदर घेतली तर सर्व विरोधी पक्षांची गोची होणार आहे. कारण विरोधकांची अजून तयारी झालेली नाही, भाजप मात्र निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी तयार झालेला आहे.

२०१४ पासून देशातील राजकारण बदलले. विरोधकांची केवळ तोंडे बंद करून ठेवणे पुरेसे नाही तर या विरोधी नेत्यांचे पक्ष संपवण्याची नवी स्टाईल २०१९ पासून आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात जे महाभारत सुरु आहे. त्यातून दोन भाजपविरोधी राजकीय पक्ष मुळासकट हादरले आहेत. यातून केवळ विरोधी नेते संपू लागलेत असे नव्हे तर खुद्द भाजपमधीलही अनेकजण मुस्कटदाबी सहन करत आहेत. भाजपमध्ये निष्ठावान जळफळाट व तडफड आतल्याआत अनुभवत आहेत. 

बहुतेकजण सहन करत आहेत. कारण परिस्थितीच तशी आहे. आवाज काढून किंवा बोलून सध्या अर्थ नाही. एखादीच पंकजा मुंडे किंवा नितीन गडकरी अधूनमधून बोलतात.अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शरद पवार यांना मोठा शह दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच संकटात आणले आहे. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजप नेत्यांनी बाहेर काढले व उद्धव ठाकरे यांना जवळजवळ नेस्तनाबूत करून ठेवले आहे. ठाकरेंची सेना तूर्त अस्तित्वहीन होऊ लागली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला की, बड़े बड़े राजकीय विरोधक पायाशी येतात हे भाजप नेत्यांनी ओळखले आहे. देशभरातील अनेक विरोधी आमदार सध्या भाजप श्रेष्ठीच्या पायाशी लोळण घेऊ लागले आहेत. काहीजण लोळण घेण्याच्या मार्गावर आहेत, गोव्यासह महाराष्ट्र व आसामपर्यंत हीच स्थिती आहे.

२०२४ मध्ये पुन्हा मोदीच अधिकारावर येतील अशी खूणगाठ मनाशी बाळगून प्रफुल्ल पटेलसह अनेक नेते भाजपला शरण गेले आहेत. सत्ता आणि प्रोटेक्शन हवेय गोव्यातील राजकीय नेत्यांनी व महाराष्ट्रातील पटेल आदी नेत्यांनी ओळखले आहे. 

कोकणातील नारायण राणेपासून गोव्यातील बाबूश मोन्सेरातपर्यंत सगळे नेते भाजपचा जयजयकार करत आहेत. यामागे देशप्रेम किंवा समाजप्रेम आहे असा अर्थ काढणे हा मोठा विनोद ठरेल. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांपासून मायकल लोबोंपर्यंत सगळेजण तौड गप्प ठेवून पुन्हा भाजपमध्ये परतले. कारण केंद्रात भाजपची सत्ता असताना आपण विरोधात राहून संघर्ष करू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. आता विजय सरदेसाई यांच्या कसोटीचा काळ आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष संपेल की जगेल हे पुढील दोन वर्षांत कळून येणार आहे. सरदेसाई हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात आहेत पण ते भाजपच्या विरोधात नाहीत, असा समज भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी करून घेतलेला आहे. 

सुदिन ढवळीकर अगोदरच भाजपच्या मांडीवर बसलेले असल्याने ते सेफ झोनमध्ये आहेत. सरदेसाई यांचे राजकीय भवितव्य सध्या पणाला लागले आहेत. ते आपला पक्ष वाढविण्यासाठी धडपडही करत नाहीत. काँग्रेसचे युरी आलेमाव बिचारे विरोधी पक्षनेतेपद घेऊन बसले आहेत. काँग्रेस पक्ष जे काही काम देईल तेवढेच करावे असे युरीने ठरवलेले दिसते. पुढील विधानसभा निवडणुकीत कुंकळी मतदारसंघात युरीचीही मोठी कसोटी लागणार आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी राजकारणाचा फॉर्म पूर्ण बदलून टाकलाय. पूर्वी काँग्रेस किंवा अन्य पक्षातून भाजपमध्ये एखादा नेता आला की, त्याला लवकर कोअर टीममध्ये घेतले जात नव्हते. त्याला प्रदेशाध्यक्षपद किंवा मुख्यमंत्रिपद दिले जात नव्हते, पण आता ते दिले जाते. गेल्या आठवड्यात सुनील जाखड यांची पंजाब भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते अलिकडेच भाजपमध्ये आले आहेत. आसामाचे हेमंत बिश्व शर्मा है २०१४ पर्यंत काँग्रेसचे नेते होते. आता ते भाजपचे निष्ठावान असून ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग किंवा त्रिपुराचे सीएम माणिक साहा हे बडे नेते मूळचे भाजपचे नव्हेतच ते काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेत. त्यांच्याकडे आज नेतृत्वाची धुरा आहे. अजित पवार यांनादेखील मुख्यमंत्रिपदाची हमी दिली गेली असावी.

एक दिवस अजित पवार वगैरे भाजपमध्ये विलीन होतील व मुख्यमंत्री होतील असे म्हणण्यास वाव आहे. आपण पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो, आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात म्हटले आहे. शेवटी भाजपला महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी प्रबळ मराठा नेतृत्व हवे आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात नेले जाऊ शकते. कर्नाटकमध्ये अलिकडेपर्यंत भाजप सरकारचे जेमुख्यमंत्री होते, ते बोम्मईदेखील एकेकाळी जनता दलाचेच होते. आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो तरी, नजीकच्या भविष्यात आपणदेखील गोव्यात मुख्यमंत्री होऊ शकतो, असे मंत्री विश्वजित राणे यांना वाटते. रोहन खंवटे यांनादेखील तसेच स्वप्न पडते.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आपला पक्ष घट्ट पकडून भाजपविरुद्ध लढत आहेत. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचीही आतापर्यंत बरीच तोडफोड भाजपने केली आहे. काही नेते तुरुंगातही जाऊन आले. बॅनर्जीचा संघर्ष सुरु आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचाही संघर्ष तसाच सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे लाँचिंग पक्षाकडून अनेकदा केले जाते. मात्र आज या टप्प्यावरदेखील राहुल गांधी भाजपला टक्कर देण्याएवढे सक्षम नाहीत. राहुल, ममता, नितीश कुमार किंवा शरद पवार, उद्भव, केजरीवाल यांचा संघर्ष जास्त काळ चालेल असे अनेकांना वाटत नाही. ममता आज ६८ वर्षाच्या आहेत, तर शरद पवार ८३. नितीश कुमार ७२ वर्षांचे आहेत. देशभर प्रचार करत मोदींना टक्कर देण्याच्या स्थितीत हे नेते आणि त्यांचे पक्षही नाहीत. विरोधक आणि छोटे विरोधी पक्ष संपत आहेत ही शोकांतिका नव्हे का?

लोकसभा निवडणूक जर भाजपने सहा महिने अगोदर घेतली तर सर्व विरोधी पक्षांची गोची होणार आहे. कारण विरोधकांची अजून तयारी झालेली नाही, भाजप मात्र निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी तयार झालेला आहे.

देशातील काही प्रादेशिक पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत. काही पक्ष संपून जातील. गोव्यात म.गो. पक्ष केवळ पक्षाच्या लेटर हेडवर नावापुरताच दिसू लागलाय. दिल्लीत आम आदमी पक्षाने केंद्रीय भाजप नेत्यांशी लढा देण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की मनीष सिसोदियांसारखा नेताही आता तुरुंगात आहे. अरविंद केजरीवाल आता विरोधी पक्षांची मोट बांधू पाहतात. आपल्यासोबत काँग्रेसनेही यावे असे केजरीवाल यांना आता वाटते. मात्र भाजपला घाम काढण्यापूर्वी आपण काँग्रेसला संपवूया व काँग्रेसची जागा आपण प्राप्त करूया, असे केजरीवाल व आपने दहा वर्षापूर्वी ठरवले होते. आता आम आदमी पक्षाच्या शेपटीलाच आग लागलेली असल्याने काँग्रेसने आपल्यासोबत यावे अन्य सर्व विरोधी पक्षांनी आपली साथ द्यावी, असे केजरीवाल यांना वाटते.

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभा