लोकमत न्यूज नेटवर्कम्हापसा : एकीकडे गोव्यात कोरोना महामारीमुळे सगळीकडे उद्रेक माजला असताना भाजप पक्ष तसेच त्यांचे कार्यकर्ते खासगी पार्टीत मशगुल असलेले पाहायला मिळाले. रविवारी सायंकाळी व्हायरल झालेल्या एक ाव्हिडिओत बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो तसेच भाजप उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो हे ‘मद्य पार्टीत’ सहभागी झालेले दिसले. कोरोनाच्या काळात अशाप्रकारे सत्ताधाºयांनी पार्टी आयोजन केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. याठिकाणी संबंधितांकडून मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासण्यात आला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावेळी म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो हे बॉलिवूडच्या नव्वदच्या दशकातील एका प्रसिद्ध डिस्को गाण्यावर थिरकताना दिसले. ‘आय एम अ डिस्को डान्सअर’ असे या गाण्याचे बोल असून फ्रँकी हे टी-शर्टमध्ये गाण्यावर स्वत: ठेका धरून आनंद लुटताना दिसताहेत. त्यांच्यासोबत काही तरुण मंडळी सुद्धा नृत्य करत होती. यावेळी मेजवर बिअरच्या बाटल्या असून हा २९ सेंकदचा व्हिडिओ आहे.तसेच आणखीन एका २१ सेंकदच्या व्हिडिओत हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांचे आगमन होताना दिसते. यावेळी एक व्यक्ति त्यांचे आगमन झाल्याचे सांगतो. टिकलो यांनी मास्क परिधान केलेले असते, मात्र ते त्यांच्या हनुवटीवर आहे. ती समालोचन करणारी व्यक्ति म्हणते की, ‘स्पेशल गेस्ट इन दी हाऊस... फॉर दी स्पेशल पार्टी...लॉकडाऊन पार्टी...’प्राप्त माहितीनुसार, ही पिकनीक पार्टी कळंगूट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये रविवारी आयोजिली होती. ही ठराविक लोकांसाठी निमंत्रित पार्टी होती व याशिवाय याचे नियोजन हे गुप्तपणे केले होते. मात्र, सायंकाळी या पार्टीचे दोन व्हिडिओ हे व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रत्येक गटांवर वाºयासारखे पसरले व हा चर्चेचा विषय बनला. या पार्टीत जवळपास ३० ते ४० लोक जमले होते.संबंधित व्हिडिओसंदर्भात मला कल्पना आहे. मात्र, पार्टीच्या परवानगीविषयी मला माहिती नाही. मला तिथे बोलवल्याने मी त्याठिकाणी भेट दिली. फक्त पाच मिनीटांसाठी मी आयोजनास्थळी उपस्थित होतो व त्यानंतर मी लगेच निघालो. ही पार्टी मी आयोजित केली नव्हती. तसेच पार्टीच्या आयोजनकर्ता कोण हे मला ठाऊक नाही.- ग्लेन टिकलो, हळदोणा मतदारसंघाचे आमदार
अन्य महत्वाच्या बातम्या...
सरकारची चुक दाखविणाऱ्यावर भाजपवाला 'शिक्का'; फडणवीसांची टीका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट