गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपाचा डाव; मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:02 PM2020-09-27T22:02:52+5:302020-09-27T22:03:05+5:30

गोव्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प राबविण्यास आमचा ठाम विरोध आहे - काँग्रेस

BJP's move to set up a coal hub in Goa; For the benefit of Modi's crony club | गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपाचा डाव; मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच खटाटोप

गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपाचा डाव; मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच खटाटोप

Next

पणजी :  सावंत यांच्या नेतृत्वाखालील डिफेक्टिव्ह भाजप सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच गोव्यात कोळसा हब करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

ते म्हणतात की, गोव्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प राबविण्यास आमचा ठाम विरोध आहे. गोव्याचा नाश करु देणार नाही. कोळसा हबला आम्ही विरोध करु.’ राज्य आणि केंद्र सरकार मिळून पर्यावरणाचा नाश आरंभला आहे तसेच जनतेच्या आरोग्याकडे खेळ करुन रेल्वे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हजारो झाडांची कत्तल करुन निसगार्ला हानी पोहचणार आहे. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहतील, असा इशारा चोडणकर यांनी दिला.

चोडणकर म्हणाले की, ‘मुख्यमंत्री सावंत व त्यांचे सर्व मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी यांचे व्यक्तिगत हितसबंध गुंतलेले असल्याने ते केवळ आपल्या स्वाथार्साठी लोकांना मृत्युच्या खाईत ढकलत आहेत. रेल्वे दुपदरीकरण, सागरमाला प्रकल्प तसेच कोळसा वाहतुकीसाठी खास ट्रॅक केल्यानंतर त्याचा गोव्यातील जनतेच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार आहेत. रेल्वे कायदा अमलात आणून दुपदरीकरणाचे काम करावे, असा सल्ला मुख्यमंत्री सावंत तसेच वाहतूकमंत्री मॉविन यांनी रेल्वे अधिकाºयांना देणे हे धक्कादायक आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. लोकभावनांच्या आड येत असलेले कायदे बदलणे सरकारला आम्ही भाग पाडू, असे चोडणकर म्हणाले. 

Web Title: BJP's move to set up a coal hub in Goa; For the benefit of Modi's crony club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.