पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने आपण भाजपच्या येथील कार्यालयात सातत्याने बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पक्ष संघटनेने वेगळे धोरण स्वीकारले आहे. पक्ष संघटनेने आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आठवड्याचा एक दिवस भाजप कार्यालयात बसण्याची सक्ती केली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासह प्रत्येक मंत्री कार्यालयात बसतीलच अशी फिल्डींग पक्षाच्या संघटनेने लावली आहे.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई इतरांचा मिळून भाजपमध्ये एक गट आहे. नोकरभरती रद्द करण्याच्या विषयावरून या गटाचा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्याशी पहिला संघर्ष झाला. या गटाची नुकतीच एक गुप्त बैठकही झाली. भाजपची पक्ष संघटना आपल्याला डावलू पाहते अशी भावना झाल्यानंतर आपण दर सोमवारी पणजीत येऊन भाजपच्या कार्यालयात बसेन व कार्यकर्त्यांना भेटेन, असे माजी मुख्यंमत्री पार्सेकर यांनी जाहीर केले.गोव्यात पार्सेकर हे भाजपचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते आणि फेब्रुवारी 2017 मधील निवडणुकीत भाजपचा पराभव होईपर्यंत पार्सेकर हे मुख्यमंत्रिपदी होते. मात्र आता मुख्यमंत्री पर्रीकर यांनीच पूर्ण पक्षावर नियंत्रण प्राप्त केले व सगळे पराभूत बाजूला पडले अशी स्थिती निर्माण झाली. पार्सेकर यांनी या सगळ्य़ा पार्श्वभूमीवर दर सोमवारी पक्ष कार्यालयात येऊन बसणो सुरू केले आहे. दुस:याबाजूने भाजपच्या पक्ष संघटनेने पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आठवडय़ाला एक दिवस कार्यालयात येऊन बसा असा फतवा जारी केला. त्यानुसार आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे शनिवारी पक्ष कार्यालयात दोन तास येऊन बसले व त्यांनी कार्यकत्र्याचे म्हणणो ऐकून घेतले. विद्यमान सरकार हे आघाडीचे असल्याने आघाडीच्या घटक पक्षांचेच जास्त ऐकले जाते, आमचे कुणी ऐकत नाही अशी भाजपच्या कार्यकत्र्याची भावना झालेली आहे. मात्र आता मंत्री पक्षाच्या कार्यालयांमध्ये खास भाजपच्याच कार्यकत्र्याना भेटण्यासाठी बसू लागल्याने ही भावना दूर होण्यास मदत होईल, असे पक्षाच्या काही पदाधिका-यांना वाटते.
येत्या आठवडय़ात वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे पक्ष कार्यालयात बसणार आहेत. भाजपच्या सर्व कार्यकत्र्यांनी यापुढे सचिवालयात किंवा मंत्रलयात जाऊन लोकांच्या गर्दीमध्ये स्वपक्षीय मंत्र्यांना भेटण्यासाठी धडपड करू नये, त्याऐवजी पक्ष कार्यालयात येऊन भेटावे, अशी सूचना पक्ष संघटनेने गोवाभरातील आपल्या कार्यकत्र्याना केली आहे. आपल्या भागात कोणत्या सार्वजनिक समस्या आहेत, त्यात सुधारणा कशी व्हायला हवी याविषयी कार्यकत्र्यानी मंत्र्यांशी चर्चा करणो व मंत्र्यांनी त्यावर तोडगा काढणो अपेक्षित आहे, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.