कॉंग्रेस उमेदवाराच्या नावे बोगस ऑडिओ व्हायरल; निवडणूक आयोगाकडे तक्रार
By वासुदेव.पागी | Updated: May 5, 2024 15:59 IST2024-05-05T15:58:43+5:302024-05-05T15:59:01+5:30
कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील लोकसभा उमेदवार विरियातो फर्नांडीस यांच्या नावाने एक ऑडिओ व्हायरल झाला आहे.

कॉंग्रेस उमेदवाराच्या नावे बोगस ऑडिओ व्हायरल; निवडणूक आयोगाकडे तक्रार
पणजी : कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडीस यांच्या नावे बोगस ऑडिओ क्लिप व्हायल करण्यात आल्याची तक्रार कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या एक ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला असून कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील लोकसभा उमेदवार विरियातो फर्नांडीस यांच्य नावाने ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्या ऑडिओमध्ये काही वादग्रस्त विधाने आहेत. सोशल मिडियावर हा ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र विरियातो यांनी या ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे म्हटले आहे.
आपल्या आवाजाची नक्कल करून किंवा एआय सारखे तंत्रज्ञान वापरून हा ऑडिओ बनविण्यात आल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस उमेदवाराची बदनामी करणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे असाही दावा तक्रारदार सुनील कवठणकर यांनी केला आहे. हा ऑडिओ एका सोशल मिडिया ग्रुपवर अपलोड झालेला असल्यामुळे या ग्रुपच्या अडमिनची चौकशी करण्यात यावी असी मागणीही या तक्रारी कवठणकर यांनी केली आहे.