सद्गुरू पाटील / पणजीगोव्यात आज, शनिवारपासून तीन दिवसांची ब्रिक्स परिषद सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन या परिषदेसाठी शुक्रवारी रात्री गोव्यात दाखल झाले. ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाचा मान गोव्याला प्रथमच मिळत आहे. भारतासह चीन, रशिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका अशा एकूण ११ देशांचे प्रतिनिधी ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्या असलेल्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान तसेच काही केंद्रीय मंत्री व वरिष्ठ अधिकारी या परिषदेत भाग घेत असल्याने गोवा सरकारने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. ताज एक्झॉटिका, लीला अशा चार पंचतारांकित हॉटेल्समध्ये परिषद होणार आहे. त्यापैकी ताज एक्झॉटिकामध्ये पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निवास आहे. ब्रिक्स राष्ट्रांमधील संबंध, व्यापार, व्यवहार, गुंतवणूक याविषयी ब्रिक्स परिषदेत चर्चा होईल. स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना गोव्यात चोगमचे आयोजन केले होते. (खास प्रतिनिधी)
गोव्यात आजपासून ब्रिक्स; पंतप्रधान दाखल
By admin | Published: October 15, 2016 3:43 AM