शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

ब्रिटीश महिलेवर बलात्कार केलेल्या आरोपीचे शौचालयातून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:42 PM

मडगावच्या न्यायालयातील घटना : बलात्कारासह पर्यटकांना लुटण्यातही होता सामील

- सुशांत कुंकळयेकरमडगाव : पाळोळे- काणकोण येथे सहा महिन्यापूर्वी एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला यल्लप्पा रामचंद्रनप्पा या आरोपीला शुक्रवारी मडगाव न्यायालयात सुनावणीस आणले असता शौचालयात जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. बलात्कार प्रकरणातील पलायन करणारा हा दुसरा आरोपी असून यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये बेतालभाटी सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी ईश्वर मकवाना याने इस्पितळात उपचार चालू असताना पळ काढला होता. या घटनेला सहा महिने उलटूनही आरोपीचा छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले आहे.

    दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शुक्रवारी सकाळी त्याला पणजी एस्कॉर्ट पोलिसांनी कोलवाळ तुरुंगातून मडगाव न्यायालयात आणले होते. न्यायालयात पोहचल्यानंतर आरोपीने आपल्याला शौचालयात जायला पाहिजे, असे सांगून तळमजल्यावरील शौचालयात तो गेला. नंतर त्याने शौचालयाच्या खिडकीला लावलेल्या काचा काढून मागच्या बाजूने पळ काढला. शौचालयात गेलेला आरोपी बराच वेळ होऊनही  बाहेर आला नसल्याने संशय आलेल्या पोलीसांनी आत जाऊन बघितले असता आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

  या प्रकरणी मडगाव पोलीसात तक्रार दिल्यानंतर लगेच शोधाशोध सुरु झाली. पोलीसानी मडगाव रेल्वेस्थानक परिसर आणि इतर ठिकाणे पिंजून  काढूनही आरोपी हाती लागू शकला नाही. संपूर्ण गोव्यातील पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे गावस यांनी सांगितले.

     मागच्या डिसेंबर महिन्यात काणकोण तालुक्यातील पाळोळे समुद्र किना:यावर उतरलेल्या एका 37 वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिचे सामान लुटल्याच्या आरोपाखाली  रामचंद्रनप्पा  याला मडगाव रेल्वे स्थानकावर अटक केली होती. त्यानंतर सदर आरोपीचा त्यापूर्वी उत्तर गोव्यातील मांद्रे येथे एका पर्यटक दांपत्याचे  लाखो रुपयांचे दागिने  लुटण्याच्या घटनेतही हात असल्याचे उघड झाले होते. मूळ तंजावर - तामीळनाडू येथील हा आरोपी  चोरी करण्याच्या उददेशानेच  गोव्यात आल्याचे उघड झाले होते.

ईश्वर मकवाना अजुनही फरार काणकोणातील ही बलात्काराची घटना घडण्याच्या दहा दिवसांपूर्वी बेतालभाटी सामुहिक बलात्कार प्रकरणात मूळ मध्यप्रदेश येथील ईश्वर मकवाना हा प्रमुख आरोपी पणजीतील इस्पितळातून सुरक्षा रक्षकाना गुंगारा देऊन पळून गेला होता. आपल्या पोटात दुखत असल्याचा बहाणा करुन त्याने आरडाओरडा सुरु केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला काय झाले ते बघण्यासाठी वॉर्डचा दरवाजा उघडला असता त्या सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन आरोपीने पळ काढला होता. मूळ भिल्ल जातीच्या या आरोपीवर मध्यप्रदेशातही कित्येक बलात्कार व खुनाचे गुन्हे दाखल झाले होते. मध्यप्रदेश पोलीसांसाठीही तो मोस्ट वॉंटेड होता. मागचे सहा महिने गोवा पोलीस त्याचा शोध घेत असून अजुन तो सापडलेला नाही. त्याच्या विरोधात मडगाव न्यायालयाने फरारनामाही जारी केला आहे.

...अन् दुसराच चोरटा सापडला न्यायालयाच्या शौचालयातून पळून गेलेल्या रामचंद्रनप्पाचा शोध घेण्यासाठी मडगावचे एलआयबी पोलीस मडगाव रेल्वेस्थानक परिसर  पिंजून  काढत असताना  योगायोगाने त्यांच्या हाती नूर महम्मद हा भलताच चोरटा हाती लागला. मागच्या रविवारी लोटली येथील अवर लेडी ऑफ मिलाग्रीस सायबिणीचे कपेल फोडून त्यातील देवाच्या मूर्ती चोरुन नेल्या होत्या. या चोरीत नूर महम्मदचा हात होता अशी माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारtheftचोरीgoaगोवाPoliceपोलिस