किशोर कुबल/पणजीपणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता बोलावण्यात आले असून ९ तारीखपर्यंत ते चालणार आहे. प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचे असणार आहे.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार असून आर्थिक सर्वेक्षण अहवालही सादर केला जाईल. नवीन वर्षाचे पहिले अधिवेशन असल्याने पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल.