शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

By किशोर कुबल | Published: December 15, 2022 6:06 PM

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

पणजी : क्रुझ लायनर जहाजातून गोव्याच्या मुरगांव बंदरात उतरलेल्या सुमारे ८0 अमेरिकन पर्यटकांना गोवा दर्शनासाठी बसेसमध्ये प्रवेश करण्यास टुरिस्ट टॅक्सीचालकांनी मज्जाव केल्याचे प्रकरण राज्य सरकारने गंभीरपणे घेतले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची दादागीरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अमेरिकन पर्यटकांची सरकारच्यावतीने माफी मागितली असून लवकरच मुरगांव बंदरात पर्यटकांसाठी काउंटर उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुरगांव बंदरात उतरलेल्या पर्यटकांनी टुरिस्ट टक्सींमधून गोवा दर्शन करावे, ट्रॅव्हल एजन्सीच्या बसमधून (कोच) नव्हे, असा पवित्रा घेत टॅक्सीचालकांनी या पर्यटकांना अडविले. मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आणि ज्या कोणी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

टूर आॅपरेटरच्या बस चालकावर एका टॅक्सीचालकांना थप्पड मारली. पर्यटकांना बसमधून नेल्यास दगडफेक करु, अशी धमकी टॅक्सीवाल्यांनी दिल्याचाही आरोप केला जात आहे. या एकूण प्रकारामुळे पर्यटक भांबावले व गोवा दर्शनाच बेत रद्द करुन क्रुझ लायनरमध्ये परतले.

या प्रकरणी टूर आॅपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. असा प्रकार जर घडला असेल तर संबंधिताला अटक केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टूर आॅपरेटर्सनी मुख्यमंत्र्यांना भेटले -या प्रश्नावर काही टूर आॅपरेटर्सनी नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व अशाने गोव्याचे नाव जगभर बदनाम होईल, याकडे लक्ष वेधले. अमेरिक न पर्यटकांनी गोवा दर्शनासाठी आधीच बसेस आरक्षित केल्या होत्या.

पर्यटनमंत्र्यांकडून माफी : बंदरात पूर्ववत् जीटीडीसीचा काउंटर येणार -दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकाराबद्दल सरकारच्यावतीने पर्यटकांची माफी मागितली असून लवकरच मुरगांव बंदरात पर्यटन विकास महामंडळाचा काउंटर पूर्ववत सुरु केला जाईल, असे सांगितले. खंवटे म्हणाले की, अशा प्रकारांमुळे गोव्याची बदनामी होईल. जहाजाच्या कप्तानाने पुन्हा आपण गोव्यात येणार नाही, असे जाहीर केले आहे. अमेरिकन पर्यटक जादा खर्च करणारे असतात. अशा हाय एंड पर्यटकांची गोव्याला गरज आहे.’ 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनAmericaअमेरिका