लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी पोलिस विशेष मोबाईल तंत्रज्ञान वापरत आहेत. कळंगुट पोलिसांनी असे ४१ महागडे पुन्हा ताब्यात घेतले आहेत. महागडे चोरीचे मोबाईल कमी पैशांत विकत घेणारे पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यावर कुरियरनेदेखील पाठवून देतात.
"कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली. अशा प्रकारे जप्त केलेल्या मोबाईल संचांमध्ये आयफोन तसेच इतर महागड्या मोबाईल्सचा समावेश आहे. ६० ते ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
सावंत यांनी यापूर्वी खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीमध्येही काही काळ काम केले आहे खाण घोटाळ्याच्या व्याप्तीसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, 'एसआयटी पथकात असताना तपास अधिकारी म्हणन मी एक अहवाल दिला होता. त्यात एका बेकायदा खाण प्रकरणात १५० बेकायदा खाण प्रकरणात १५० होता. एका खाण व्यावसायिकाचे ६९ कोटी रुपये असलेले बँक खाते गोठवले परंतु नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यावरील स्थगिती उठवली होती, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटनस्थळामुळे मोठे आव्हान
कळंगुट पोलिस स्थानक हे सोन्याची अंडी देणारे पोलीस स्थानक अशी सर्वांची समजूत आहे. या पोलिस स्थानकात बदली करुन घेण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी धडपडत असतात. याबाबत विचारले असता ते म्हणाले की. सोन्याची अंडी वगैरे देणारे पोलिस स्थानक हा चुकीचा समज आहे. पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठे आव्हान आहे.
...म्हणून होतात पर्यटकांबरोबर वाद
एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, 'पर्यटक बहुतांश वेळा मद्यप्राशन करून स्थानिकांबरोबर हुज्जत घालतात. त्यामुळे मारामारी होते. अनेकदा शॅकमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्यानेही वाद होतात.
...तर परिस्थिती निवळते
राजकारण्यांकडून अनेकदा फोन येतात, परंतु त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली की, नंतर कोणताही दबाव येत नाही. पोलिस अधिकाऱ्याने आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहायला हवे, असे सावंत एका प्रश्नावर सावंत म्हणाले.
एक हजार मोबाइल कायमचेच बंद
जे मोबाइल संच हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर वारंवार प्रयत्न करूनही ट्रॅकिंगला लावल्यानंतरही सापडत नाहीत, ते मोबाइल कायमचे बंद करण्याचा पर्याय पोलिसांकडे आहे. ईएमआई क्रमांकावरून असे मोबाइल कायमचे बंद केले, तर मोबाइल चोरटा त्याचा कधीच वापर करू शकणार नाही. असे सुमारे १ हजारपेक्षा अधिक मोबाइल कायमचेच बंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"