शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गोव्यातील लढतींनंतर उमेदवारांचा आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:55 PM

गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे. 

ठळक मुद्देगोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला.आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे. उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक, काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर आणि काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना बुधवारी थोडी तरी विश्रांती मिळाली.

पणजी - गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपाच्या प्रचारासाठी गोव्यातील चाळीसपैकी एकूण 38 मतदारसंघांमध्ये फिरले. बुधवारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांनी सहकुटूंब आराम केला. उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक, काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर आणि काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना बुधवारी थोडी तरी विश्रांती मिळाली आहे. भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांसोबत चर्चा करून मतदानानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. कोणत्या भागात भाजपल किती मते मिळतील, कोणत्या भागात काँग्रेसला आघाडी मिळेल याचा आढावा घेतला गेला. तसेच ख्रिस्ती मतदारांनी कोणत्या भागात काँग्रेसला जास्त मतदान केले असेल, आपल्या पक्षाच्या ख्रिस्ती आमदारांमुळे भाजपला कुठच्या पंचायत क्षेत्रात ख्रिस्ती मतदान झालेले असेल याचीही गणिते भाजपाच्या कोअर टीमने मांडली आहेत. 

मगोपचे उमेदवार दिपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघात भाजपाचे सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली. शिरोडामध्ये काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक हे तिसऱ्या स्थानी आहेत. मगोप व भाजपाचे कार्यकर्त्यांनी बुधवारी मतदानाच्या सगळ्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यावर भर दिला. शिरोडकर यांनी विश्रांती घेतली. त्यांचे काही कार्यकर्ते मात्र शिरोडकर यांना कोणत्या पंचायत क्षेत्रात किती मते मिळतील याचे गणित मांडण्यात व्यस्त राहिले.

मांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवार जित आरोलकर आणि भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्यात मोठी लढत झाली आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गेले पंचवीस दिवस प्रचार कामात व्यस्त राहिले. काँग्रेसचे उमेदवार बाबी बागकर यांनीही खूप परिश्रम घेतले. मांद्रे मतदारसंघात काही जणांनी पैसाही खूप खर्च केला. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांनी आरोलकर यांच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळत आहे. आरोलकर यांनी बुधवारी विश्रांती घेतली. तर बागकर यांनी कुटूंबियांसोबत वेळ घालविला आहे.  

 

टॅग्स :Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस