पणजी: कोकणी साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांना "वर्सल" या कथा संग्रहासाठी केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे.
यापूर्वी त्यांना "इगडी,बिाडी, तिगडी, था" या बाल साहित्यासाठी साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला होता. डॉ. प्रकाश पर्येकर हे कोकणी साहित्यिक असून ते सत्तरी येथील आहे. त्यांचे लखेन हे ग्रामीण भूगोल, ग्रामीण संस्कृती तसेच तेथील लोकांवर आधारीत असते.
"वर्सल" हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात २० कथा एकत्र केल्या आहेत .९० च्या दशकात आणि विसाव्या दशकाच्या सुरुवातीस विविध कोकणीमध्ये प्रकाशनांमध्ये वर्सल चे प्रकाश झाले आहे. यातील अनेक कथांचे मराठी, हिंदी, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, उर्दू, ओडिया आदी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. डॉ. पर्येकर यांच्या कथांमधून समृध्द भाषा तसेच निसर्गाशी परिचय दिसू येतो.