किशोर कुबल, पणजी: शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचा वापर केला जाईल. त्यासाठी आहार पुरवणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,‘ २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने तृणधान्य वापराचा प्रसार केला जाईल. महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण देऊन आहारात तृणधान्य कसे वापरता येईल. कोणकोणते पदार्थ बनवता येईल, हे सांगितले जाईल. सध्या पावभाजी, उसळ आदी पदार्थ दिले जातात.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार राज्यात सुमारे १ लाख ६३ लाख १२३ विद्यार्थी माध्यान्ह आहाराचा लाभ घेत आहेत. त्यावर वर्षाकाठी ३९ कोटी ५३ लाख रुपये खर्च केला जात आहे. अंदाजे ९० हून अधिक स्वयंसहाय्य गट वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यांना आहार पुरवतात.