शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

सभापतींनी रोखले मुख्यमंत्र्यांना...

By admin | Published: August 07, 2015 2:10 AM

पणजी : जुने गोवे येथे एका फ्लॅटमध्ये खोर्ली येथील विधवेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पूर्ण कथानकाचे वाचन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे

पणजी : जुने गोवे येथे एका फ्लॅटमध्ये खोर्ली येथील विधवेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पूर्ण कथानकाचे वाचन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे गुरुवारी विधानसभेत करत असताना सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी हस्तक्षेप केला व त्यांना थांबविले. प्रत्यक्ष कारवाईच्याच विषयाबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना सभापतींनी मुख्यमंत्र्यांना केली. दोन दिवसांपूर्वी ३० वर्षीय विधवा मोलकरणीवर आठ युवकांनी बलात्कार करण्याची घटना घडली. त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. मूळ बेळगाव येथील ही मोलकरीण खोर्ली येथे राहते. तिच्यावर २९ जुलै रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराचा मुद्दा आमदार विष्णू वाघ यांनी शून्य प्रहरावेळी विधानसभेत उपस्थित केला व आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली. या वेळी आपण त्या महिलेची पूर्ण तक्रारच वाचून दाखवतो, असे सांगून मुख्यमंत्री इंग्रजीत असलेली ती तक्रार वाचू लागले. मुख्यमंत्री मध्ये कुठे तरी थांबतील, असे प्रथम काही अपक्ष आमदारांना वाटले; पण मुख्यमंत्री थांबेनात. ते पूर्ण तक्रार वाचून दाखवू लागले. बलात्कार झालेल्या महिलेची ओळख पटणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली; पण इतर बराच तपशील ते वाचू लागले. त्या महिलेला मुलावर उपचार करण्यासाठी पैसे हवे होते. एका युवकाने तिला २ हजार रुपये देतो, असे सांगितले व त्या बदल्यात आपल्याला शरीरसुख देण्याची विनंती केली. तिने ती मान्य केली, असा तक्रारीतील मजकूर मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तिथे असलेल्या २७ वर्षीय योगेश खांडेपारकर या पोलिसानेही तिच्याकडे तशीच अपेक्षा व्यक्त केली. आपली अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर आपण पोलिसांची जीपगाडी फ्लॅटकडे बोलवतो, असेही त्या पोलिसाने मोलकरणीला सांगितले. नंतर त्या पोलिसासह एकूण आठजणांनी तिच्यावर बलात्कार केला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या वेळी अपक्ष आमदार विजय सरदेसाई उभे राहिले. बलात्कार प्रकरणात आरोपींविरुद्ध कारवाई काय केली, ते सांगा. चौघांना पकडलेय व बाकीचे आरोपी तुम्हाला मिळालेले नाही, असे सरदेसाई यांनी नमूद केले. या वेळी सभापती आर्लेकर यांनीही बलात्काराच्या तक्रारीचा तपशील वाचू नका, कारवाई झाली असेल तर त्याविषयी माहिती द्या, अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी त्या सूचनेनुसार नंतर कारवाईबाबतची माहिती दिली व आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होईल, याची हमी दिली. (खास प्रतिनिधी)