शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

कर्नाटकच्या डीपीआरला न्यायालयात आव्हान द्या; वेळ न दवडण्याचे आवाहन, विलंबाबद्दल नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 3:13 PM

चिंबल ग्रामसभेत ठराव संमत 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवावा. कळसा, भांडुरा प्रकल्पावरील कर्नाटकच्या डीपीआरला राज्य सरकारने वेळ न दवडता न्यायालयात आव्हान द्यावे, असा एकमुखी ठराव चिंबल ग्रामसभेत संमत केला.चिंबल पंचायतीची ग्रामसभा रविवार दि. १९ रोजी झाली. यावेळी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर व उपस्थितांना म्हादई प्रश्नी मार्गदर्शन आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी केले. म्हादई नदी वळवण्यासाठी कर्नाटक कळसा, भांडुरा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठीच्या डीपीआरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, इतके दिवस होऊनसुद्धा गोवा सरकाने या डीपीआरला न्यायालयात आव्हान का दिले नाही ? सरकार विलंब का करीत आहे ? असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला.

राज्य सरकारनेही डीपीआर काढावा

गोवा सरकारनेसुद्धा डीपीआर तयार करून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा. म्हादईचे पाणी गोव्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याची माहिती देणारा तसेच या पाण्याच्या वापराबाबतचा अहवाल सरकारने तयार करणे आवश्यक होते. मात्र, सरकारने कुठलीच हालचाल केली नसल्यानेच म्हादई प्रश्नी गोव्याची बाजू कमजोर बनल्याची टीका ग्रामसभेत चिंबलवासियांनी केली.

व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करताना शेतजमिनी वगळा

म्हादई वाचवण्यासाठी गोवा सरकारने त्या परिसरातील वन्यजीव संरक्षण क्षेत्र हे व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करावे, असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ गुरुदास शिरोडकर यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्र हे व्याघ्र क्षेत्र म्हणून प्राधान्याने अधिसूचित करताना सरकारने रहिवासी क्षेत्र, शेतजमिनी वगळावेत, अशी मागणी केली. 

केंद्राकडे म्हादई वाचवा, अशी वारंवार विनंती करण्याऐवजी सरकारने न्यायालयीन लढा द्यावा. म्हादई वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा