नारायण गावस
पणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.
बदलत्या हवामानाचा फटका राज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.
आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.
काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाल( नारायण गावस : पणजी, गोवा )बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम शक्य: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंतापणजी: राज्यात बदलत्या हवामानाचा फटका आता शेतीबागायतीवर दिसून येत आहेत. यंदा काजू तसेच आंब्याच्या पिकाला या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात ऐन थंडीच्या हंगामात हाेत असलेली उष्णता तसेच मधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी काजूच्या तसेच आंब्याच्या बहर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून काही काजू आंब्यांना बहरही आलेला नाही.बदलत्या हवामानाचा फटकाराज्यात हवामान झपाट्याने बदलत आहे. सध्या जानेवारी पर्यंत कडाक्याची थंडी पडणे गरजेचे होते. हे थंडी काजू आंब्याच्या पिकाला लाभदायक आहे. पण या पिकांना हवी तशी थंडी पडत नसल्याने या पिकांना अजून मुबलक असा बहर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम नुकसानीत जाण्याची भिती काही शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी काजूला चांगले पीक मिळाले होते. पण दर कमी मिळाला पण सरकारने आधारभूत किमत दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला होता.गाेव्यात काजूचे पिक माेठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर शेती बागायती साेडून काजू बागायतीवर भर दिली आहे. राज्यात सर्वात जास्त लागवड ही काजूची होत असते यातून शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळत असतो. पण मागील काही वर्षापासून वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे काजू पिकाची लागवड आता कमी होत आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सत्तरी,काणकोण, डिचाेली, पडणे, सांगे तालुक्यामध्ये काजूचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.
आम्ही मागील दहा वर्षांपासून भात शेती साेडून काजू बागायतीची शेती करत आहोत. सुरवातीला काजूच्या बागायतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता वातावरणात हाेत असलेल्या बदलामुळे लागवड खूप कमी झाली आहे. या वर्षीही पीक खूप कमी येण्याची शक्यता आहे झाडांना आलेला बहरही जळाला आहे, रामा गावकर काजू शेतकऱ्यांने सांगितले.
काजू बागायती शेती आता न परवडणारी झालेली आहे. पूर्वी सारखी लागवड होत नाही. तसेच काजूला रोटा नामक कीड लागत असते. तसेच वातावरणाचा फटका बसत आहे. यंदाच्या वर्षीही आम्हाला जास्त पीक मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महादेव वेळीप काजू उत्पादक शेतकरी शेतकरी म्हणाला.