शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

केपटाऊननंतर चेन्नई आणि नंतर आपली पाळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:52 PM

  - राजू नायक २०१८च्या सुरुवातीला केपटाऊनला आंतरराष्ट्रीय मथळे मिळण्याचे कारण होते, तेथील जलदुर्भिक्ष. शहराला तीव्र पाणी टंचाईने ग्रासल्यामुळे ...

 

- राजू नायक२०१८च्या सुरुवातीला केपटाऊनला आंतरराष्ट्रीय मथळे मिळण्याचे कारण होते, तेथील जलदुर्भिक्ष. शहराला तीव्र पाणी टंचाईने ग्रासल्यामुळे तेथील ४० लाख लोकसंख्येवर तहानेने तडफडण्याची पाळी आली. एका महत्त्वाच्या शहराचा पाणीपुरवठा ‘शून्यावर’ आल्याचे सा:या जगाने भयभीत होत पाहिले. त्यावेळी अनेक तज्ज्ञांनी इशारा देऊन ठेवला होता, केपटाऊनचे संकट उद्या आमच्यावरही येऊ शकते.

देशामधला सतत पाचवा पावसाळा वाकुल्या दाखवत असल्यामुळे चेन्नई शहरही याच संकटाच्या खाईत लोटले जात असून त्या शहरातील ही समस्या उद्या भारतात सर्वत्र तर उत्पन्न होणार नाहीए ना, या काळजीने अनेक शहरांना ग्रासले आहे.

चेन्नईत गेले २०० दिवस ओळीने पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. गेल्या ३० वर्षातील ही सर्वात भीषण परिस्थिती आहे. स्वाभाविकच शालेय विद्यार्थ्यापासून आयटी क्षेत्र, व्यापारी संकुल व एकूणच रहिवासी यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उद्या आपले काय होणार या विवंचनेने सर्वाना ग्रासले आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणा-या सर्व चार तलावांनी नीचांक गाठला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होत असून शहरातील जवळ जवळ नऊ लाख लोकसंख्येला त्यांच्यावर अवलंबून राहावे लागते. जेथे १३०० एमएलडी पाण्याची गरज असता महानगरपालिकेला 83० एमएलडी पाणी पुरविणो शक्य झाले आहे. वस्तुस्थिती : त्यातील 8० टक्के पुरवठा सुरळीत नाही. त्या शहराला यावर्षीही पावसाने दगा दिला तर परिस्थिती आणीबाणीची बनेल व नवे ‘केपटाऊन’ आपल्या देशातही ‘तयार’ होईल!तज्ज्ञ मानतात ही मानवनिर्मित टंचाई आहे. मी २० वर्षापूर्वी पर्यावरणवादी पत्रकार म्हणून या शहराला भेट दिली होती. त्यावेळी टँकरपाठोपाठ धावणारे लोक जसे आम्ही पाहिले तसे इमारतींना जलसंवर्धनाची सक्ती झाल्याचे पाहून समाधान वाटले होते व परिस्थितीवर मात केली जाईल असे वाटले होते. दुर्दैवाने सरकारी अनास्था, बिल्डर्सचे लागेबांधे, लोकचळवळीचा अभाव या कारणांनी चेन्नईची परिस्थिती आणखी बिकट बनली.चेन्नईने इतर शहरांप्रमाणोच जलसंपत्तीची कदर केली नाही. चेन्नई व आसपासच्या भागांमध्ये सहा हजार तलाव होते. त्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होई. चेन्नई शहरातच 15क् तलाव बुजविण्यात आले. त्याशिवाय नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना वाट मोकळी करून देताना अनेक कालवे व पाणीपुरवठा यंत्रणा निकामी बनविण्यात आल्या. इतर ठिकाणचे जलस्नेत सांडपाण्यामुळे प्रदूषित, निकामी बनलेत. एक नदी तर संपूर्णत: गटार बनली आहे. सरकारने नदी पुनर्वसनावर करोडो रुपये खर्च केले; परंतु तेही गटारात वाहून गेले. या भागाची लोकसंख्या जी १९९१ मध्ये ३९ लाख होती ती आज ७० लाख बनली आहे.निसर्गाचीही अवकृपा झाली. तेथे पावसाची तूट ८० टक्के आहे. चेन्नई हे समुद्राकाठचे शहर असल्याने पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते.या परिस्थितीवर मात करायची कशी? पावसाचे पाणी अडवा, जलसंवर्धन योजना राबवा व क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करा, अशा काही शिफारशी आहेत. दुर्दैवाने सक्ती असूनही अनेक प्रकल्पांनी जलसंवर्धन योजना राबविलेल्या नाहीत. आज जलदुर्भिक्षामुळे येथील आयटी उद्योगच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीचा फायदा घेत शहरात जलसाठय़ांवर कब्जा करणा:या गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या असून रक्तपाताचीही भीती निर्माण झाली आहे. निष्कर्ष असा की केपटाऊनच्या पावलावर पाऊल ठेवण्याची सारी सज्जता चेन्नईने केली आहे.

चेन्नईच का, देशातील बहुतेक शहरे याच मार्गाने चालली नाहीत काय? जेथे सर्वात अधिक पाऊस पडतो त्या मेघालयातही परिस्थिती गंभीर आहे आणि उत्तर भारतासह महाराष्ट्राला हीच चिंता सतावू लागली आहे. परंतु केपटाऊनची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण काही गंभीर उपाय योजणार की नाही? जलसंवर्धन व पाणी जपून वापरण्याचे जे उपाय आपल्या हातात आहेत, तेसुद्धा आपण कधी आचरणार आहोत?(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)