शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 9:42 PM

सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले.

पणजी - गोव्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या सोमवारी म्हणजेच २८ मार्चला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दोनापॉल येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी ११ वाजता होणार असलेल्या या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नीतीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच भाजपची सत्ता असलेल्या सात राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयातून मोदीजींच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असून दोनापॉल येथे स्टेडियमजवळ हेलिपॅड बांधण्याची तयारीही सुरु झाली आहे. 

सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले. यापूर्वी शपथविधीसाठी २३ तारीख ठरली होती. परंतु उद्या उत्तराखंडमध्ये सरकारचा शपथविधी असल्याने व पंतप्रधान मोदीजी तसेच अमित शाह तेथे उपस्थित राहणार असल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील २० पदाधिकारीही शपथविधीसाठी येतील. शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी व्हावेत आणि जनतेच्या साक्षीने हा सोहळा व्हावा यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम निवडले आहे. हा सोहळा दिमाखदार होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.दरम्यान, भाजपकडे स्वत:च्या २० आमदारांसह मगोपचे २ व अपक्ष ३, असे एकूण २५ आमदारांचे संख्याबळ आहे. मगोप व अपक्षांनी सोमवारी पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर केली आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व १२ मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२