मडगाव : 'गोव्याचा मुक्ती लढा आणि गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढली गेलेली ओपिनियन पोलची चळवळ या दोन्ही घटना गोव्यासाठी महत्वाच्या आहेत. जोर्पयत या घटना गोव्याच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट होत नाहीत तोर्पयत इतिहासाची ही पुस्तके अपूर्ण असल्याचा दावा करुन 2019 च्या शैक्षणिक वर्षार्पयत ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल' असे आश्र्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.ऐतिहासिक महत्वाच्या ओपिनियन पोलच्या 51वा वर्धापनदिन शासकी इतमामात मंगळवारी मडगावात साजरा करण्यात आला. यावेळी मडगावच्या कोलवा सर्कलचे नामकरण ‘जनमत कौल चौक’ असे करण्यात आले. त्याशिवाय गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या चळवळीत योगदान दिलेल्या 38 नेत्यांच्या तसबिरी लावल्या गेलेल्या ‘ओपिनियन पोल एन्क्लेव्ह’ या रस्त्याचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ओपिनियन पोलचे हे काही महानायक स्वत: उपस्थित होते तर काही महानायकांचे कुटुंबीय उपस्थित होते.गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की संघप्रदेश म्हणून त्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवावे या मुद्दय़ावरुन 1967 साली हा जनमत कौल घेण्यात आला होता. भारताच्या इतिहासातील हा असा एकमेव कौल होता ज्याचे मतदान 16 जानेवारीला झाले होते. या मतदानाच्यावेळी 54 टक्के मतदारांनी विलिनीकरणाच्या विरोधात गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम राहिले होते. या घटनेला काल मंगळवारी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा शासकीय सोहळा मडगावात आयोजित केला होता. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, उपसभापती मायकल लोबो, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर तसेच ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर हे उपस्थित होते.
ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शालेय पुस्तकात समाविष्ट करणार, मुख्यमंत्री पर्रिकर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 6:45 PM