पणजी : रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी तो आज खास आहे. कारण या दिवशी ९० टक़्के लोक सुट्टीवर आहे. जतना कर्फ्यूत सहभागी होत आहे. घरी राहून एकप्रकारे देशसेवा करीत आहे. कोरोना या विषाणुविरुद्ध लढा देत आहेत. संपूर्ण देश बंद आहे. अशा वेळी गोव्यातही एक दुर्लभ चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या घरी परिवारासोबत दिवस घालवला. त्यांनी डिजिटल पद्धतीने काम केलं. काही महत्वाच्या फाईल्स मोकळ्या केल्या. सकाळी वर्तमानपत्र वाचून काढले. टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या.
घरच्यांसोबत गप्पा मारल्या. याचा सर्वात आनंद झाला असेल तो त्यांच्या मुलीला. कारण सतत व्यस्त असणारे मुख्यमंत्री आपल्या मुलीसोबत चेस खेळताना दिसले. आपल्या बाबांसोबत चेस खेळताना मुलीला आश्चर्यही वाटले असेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मिशन कोरोना सहभागी होत यशस्वी ह्यचालह्ण रचली.