नारायण गावस
पणजी : गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापक आपल्या राजकीय हेतूमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे नाव खराब करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची दखल घ्यावी. गोवा विद्यापिठात होत असलेल्या या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच या प्राध्यापकांकडून एबीव्हीपीच्या सदस्यावर केलेले आरोप मागे घ्यावे, असे एबीव्हीपीच्या धनश्री मांद्रेकर व वैभव साळगावकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गोवा विद्यापिठात होत असलेल्या अन्यायावर आम्ही प्राध्यापकांना जाब विचारत आहोत. ही संघटना १९४९ पासून देशात कार्यरत आहे. देशभर विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही संघटना लढत आहे. गोव्यात सध्या एनएसयुआय ही संघटना राजकारण करत आहे. आम्ही राजकारण केलेले नाही. त्या दिवशी एबीव्हीपीच्या एका सदस्याचा चुकीचा व्हिडीओ वायरल करण्यात आला. त्याचप्रमाणे चुकीची माहिती पसरवली आहे. विद्यार्थ्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जाब विचारली जात होती. प्राध्यापकांशी कुठलीच गैरवर्तूणूक केलेली नाही. असे स्पष्टीकरण एबीव्हीपीच्या सदस्यांनी दिले.
तसेच एबीव्हीपीचे सदस्य प्राध्यापकांच्या कॅबीनमध्ये थुंकले असे खोटे सांगण्यात आले आहे. एबीव्हीपीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. पण आम्ही सत्य समोर आणणार आहोत. आज होणाऱ्या विद्यार्थी प्रतिनींधींच्या निवडणुकीत आम्ही लढणार आहोत, असे यावेळी धनश्री मांद्रेकर यांनी सांगितले.