पणजी: गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पदव्यूत्तरसाठी प्रवेश मिळविण्यासाठी मागासवर्गीयांसाठी आणि अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या राखिवते संबधी निर्णय घेण्यास चालढकल करण्याचे प्रथमदर्शी आमच्या लक्षात आले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयात गांभिर्याने लक्ष्य घालत लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा, गोवा वैद्यकिय महाविद्यालयासोबत राखीवेतबाबत जो काही कायदा आहे, तो दंत महाविद्यालयात देखील मुख्यमंत्र्यानी लागू करण्यावर देखील भर द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ओबीसी महासंघ गोवाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी केली.
पणजीत आयोजीत पत्रकार परीषदेत मधू नाईक, यांच्यासोबत ट्रायबल मल्टीपर्पज सहकारी संस्थेेचे कृष्णा शिरोडकर, पांडूरंग सावंत, व वासुदेव वळवईकर यांची उपस्थिती होती.आम्ही ५ एप्रिल २०२३ रोजी जेव्हा मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती, तेव्हा डेप्यूटेशन ऑफ स्पोर्टस् परसन टू नेताजी सुभाष नेशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्, पंजाब या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यासाठी ओबीसीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले होत, यानंतर या योजने अंतर्गत ८ खेळाडूंना अर्थसहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली, पण यामध्ये ६ सर्वसामान्य, १ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती यांना स्थान देण्यात आले आणि ओबीसीला यातून वगळण्यात आले, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनानंतर काहीच हालचाली न झाल्याने महासंघाच्या वतीने क्रीडा आणि युवा व्यावहार खात्याचे संचाकलांची भेट घेत याबाबत चर्चा केल्यानंतर असे कळाले की मागासवर्गीयांना राखिवता मिळू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी यात लक्ष घालून लवकरात लवकर मागासवर्गीयांना याविषयी न्याय मिळवून द्यावा, तसेच इतर आमचे चे विषय ताटकळत पडले आहेत, ते विषयाच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले.