शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुख्यमंत्र्यांचा झंझावात

By admin | Published: March 16, 2015 1:36 AM

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनविली असून रविवारी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस पेडणे तालुका प्रचारासाठी पिंजून

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनविली असून रविवारी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस पेडणे तालुका प्रचारासाठी पिंजून काढला. पार्से, कोरगाव येथे त्यांच्या मोठ्या जाहीर सभाही झाल्या. मगोच्या नेत्यांनीही नऊही जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पार्से, विर्नोडा, पोरस्कडे, तोरसे, हसापूर, नागझर, कोरगाव, पालये, हरमल, मोरजी, मांद्रे, आगरवाडा भागात दौरा केला. मोरजी मतदारसंघात पूर्वाश्रमीच्या मगोच्या नेत्या तसेच उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मावळत्या उपाध्यक्षा श्रीमती मांजरेकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. युतीचा भाजपचा अधिकृत उमेदवार येथे रिंगणात असतानाही मगोचे कट्टर कार्यकर्ते मांजरेकर यांच्यासाठी वावरत आहेत. जागा वाटपातील समझोत्यात मगोला कोणत्याही स्थितीत मोरजी मतदारसंघ आपल्याकडे यायला हवा होता; परंतु हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा असल्याने डाळ शिजली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही दोन दिवस गोव्यात राहून भाजप उमेदवारांचा प्रचार केला. मगो नेत्यांनीही प्रचारासाठी जोर लावलेला आहे. मगोचे दोन्ही मंत्री रविवारी दिवसभर प्रत्यक्ष फिल्डवर होते. वाहतूक तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मडकई, बांदोडा, उसगाव, केपे, सांताक्रुझ भागात दौरा केला. युती असली तरी सांताक्रुझ आणि चिंबल या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या एका नेत्याकडून मगो उमेदवारांच्या विरोधात काम चालू केल्याचे तसेच बाबूश मोन्सेरात यांच्या उमेदवारांना तो समर्थन देत असल्याचे दिसून आले. कारखाने, बाष्पकमंत्री दीपक ढवळीकर यांनी प्रियोळ, केरी-भूतखांब, खांडोळा, तिवरे, कुर्टी भागात रविवारी प्रचार केला. सांताक्रुझ तसेच अन्य काही ठिकाणी भाजप नेत्यांकडून होत असलेल्या फंदफितुरीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमच्यासाठी ही परीक्षाच आहे. २0१७च्या विधानसभा निवडणुकीसाठी ही सेमीफायनल म्हणून आम्ही पाहतो. (प्रतिनिधी) आणखी वृत्त पान ८, हॅलो १