शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
2
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
3
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
4
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
5
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
6
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
7
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
8
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
9
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
10
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
11
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
12
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
13
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
14
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
15
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
16
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
17
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
18
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
19
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
20
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स

चीनच्या मंत्र्यांना गोव्यातील प्रकल्पांमध्ये रस!

By admin | Published: August 13, 2016 2:02 AM

पणजी : गोव्यात साकारणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे,

पणजी : गोव्यात साकारणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. गोवा भेटीवर आलेल्या वांग यी यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व अनेक विषयांबाबत चर्चा केली. तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभी राहणार आहे. तर चिंबल येथे आयटी पार्क साकारणार आहे. चीनमधून गोव्याच्या आयटी क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री पार्सेकर व वांग यी यांच्या भेटीतून मिळाले. येत्या आॅक्टोबरमध्ये गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आले होते. ब्रिक्स परिषदेसाठी केंद्र सरकारने गोव्याची निवड केली ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक सीटीमध्ये गुंतवणुकीसाठी वाव आहे. ब्रिक्स परिषदेनंतर गुंतवणुकीबाबत स्पष्टता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोव्याच्या आयटी क्षेत्रात चीनमधील गुंतवणुकीचे स्वागत करू. ब्रिक्ससाठीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी वांग यी आले होते, असे पार्सेकर यांनी सांगितले. चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. त्यामुळे वांग यी यांनी गोव्यात येऊन सुरक्षेच्या दृष्टीने व अन्य तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. (खास प्रतिनिधी)