शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

स्क्रॅपार्डमध्ये क्लोरीन गळती, ५ जणांची प्रकृती अत्यावस्थ

By वासुदेव.पागी | Published: June 27, 2024 3:13 PM

 -मेरशी स्क्रॅपयार्डमधील घटना  पणजी.  

वासुदेव पागी, पणजीः मेरशी येथील स्क्रॅपयार्डमध्ये झालेल्या क्लोरीन गॅस गळतीमुळे ५ जणांची प्रकृती बिघडी आबे. पाचही जणांना उपचारासाठी तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.  ही घटना गुरूवारी सकाळी पाउणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. क्लोरीन गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांना त्रास होऊ लागला व अस्वस्थ वाटू लागले. त्यातच पाच जणांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. 

या घटनेची माहिती स्थानिक पोलीस व अग्नीशमन दलाला देण्यात आल्यानंतर तेथील फायर फायटर्स घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका फायर फायटरने अशा घटनांना सामोरे जाण्यास तरबेज असलेला आघाडीचा फायर फायटर अमित रिवणकर यांना याची माहिती दिली. रीवणकर हा मेरशी परिसरातील रहिवासी आहे. परंतु तो सुट्टीवर होता. परंतु खबर मिळताच तो घटनास्थळी धावून आला. खोर्लीतील सिंजेंटा कंपनीशी संपर्क करून तिथे क्लोरीन गळती होणारा सिलिंडर घेऊन येत असल्याची माहिती दिली आणि सर्व व्यवस्था करून ठेवण्यास सांगितले. मोठी जोखीम घेऊन पोलिसांच्या मदतीने फायर फायटर्सने सिलिंडर सिंजेटा कंपनीच्या प्लांटवर नेला आणि त्याचा बंदोबस्त केला. दरम्यान गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आलेल्या सर्व पाचही जणांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच ते धोक्याच्याा बाहेर आले आहेत.  या घटनेमुळे राज्यातील बेकायदेशीर स्क्रॅप यार्डचे बेकायदेशीर कारनामे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. या स्क्रॅपयार्डमध्ये क्लोरीन सिलेंडर ठेवण्याची परवानगी नसताना या ठिकाणी एक नव्हे तर तब्बल तीन क्लोरीन सिलेंडर आणलेच कसे याचीही चौकशी होणार आहे

टॅग्स :goaगोवा