शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

खुनाचा लवकर छडा लावा

By admin | Published: September 20, 2015 1:57 AM

पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील दुहेरी खून प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिसांना

पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील दुहेरी खून प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिसांना लवकरात लवकर या खुनाचा छडा लावण्याची सूचना केली आहे. एक कामगार ताब्यात धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो व जेसी गुदिन्हो या वृद्ध दाम्पत्याचा झालेला निर्घृण खून हा कामगारांनीच केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला असतानाच हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसून कामगारांनीच केला असावा, असे मत ग्रामस्थांनीही व्यक्त केले आहे. आतापर्यंत पेडणे पोलिसांनी १६ कामागारांना पोलीस स्थानकात आणून त्यांची उलट तपासणी केली आहे. तर एका कामगारावर पोलिसांचा संशय असून तो कामगार पोलिसांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत रेजिनाल्ड यांची मुले आखातातून येत नाहीत, तोपर्यंत या खुनामागचे रहस्य उलगडणार नाही. गुन्हेगारांनी कसला तरी राग डोक्यात घेऊन सपासप कोयत्याने वार करून वयोवृध्दांचा खून केला आहे. या खुनाने संपूर्ण तालुका हादरला आहे. लोक हळहळ व्यक्त करीत आहेत. या खुनामागे जे कोणी असतील त्यांना पोलिसांनी लवकर अटक करून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी धारगळचे माजी सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक यांनी केली आहे. सध्या धारगळ गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक करण्याची मागणी भूषण नाईक यांनी केली आहे. गुदिन्हो यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे अनेक कामगार होते. कामासंबंधातील व्यवहारांवरून गुदिन्हो व कामगारांमध्ये अनेकवेळा शाब्दिक खटके उडायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजिनाल्ड गुदिन्हो यांनी एका कामगाराला मारहाण करून कामावरून काढले होते. त्या कामगाराला पैसेही दिले नव्हते, तसेच एका वर्षांनतर त्याच कामगाराने रेजिनाल्ड गुदिन्हो यांच्यावर हल्ला केला होता. त्याच कामगाराने हा खून केला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)