पणजी : लुईस बर्जर लाचप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली. पणजी पोलीस मुख्यालयात असलेल्या चर्चिल यांनी रविवारी सायंकाळी या अधिकाऱ्यास धमकी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या धमकीप्रकरणी आज, सोमवारी तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चर्चिल आलेमाव, जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर आणि लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. विशेष न्यायालयात जैका प्रकरणातील तीन संशयितांच्या जामीन अर्जांवर सुनावणी होणार आहे. तिन्ही संशयितांपैकी चर्चिल आलेमाव पोलीस कोठडीत आहेत. वाचासुंदर आणि मोहंती हे न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस कोठडीतील संशयितांपेक्षा न्यायालयीन कोठडीतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता अधिक असते. असे संशयित पोलीस कोठडीत राहून न्यायालयीन कोठडीत आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांना अधिक वेळ मिळालेला असतो. पोलीस कोठडीतील संशयितांना न्यायालयीन कोठडीत पाठविल्यानंतर त्यांना जामीन मिळविणे सोपे जात असते. या पार्श्वभूमीवर चर्चिल, वाचासुंदर आणि मोहंती यांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. विरोध करताना पोलीस कोणती भूमिका घेतील (पान २ वर)
चर्चिलची अधिकाऱ्यास धमकी
By admin | Published: August 10, 2015 1:21 AM