लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सात वर्षांत १३ लाख ९१ हजार ९४८ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. ६५८ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
१४६२ हेक्टर जमिनीतील पिकांचा १५ कोटी २० लाख ८ हजार ५३३ रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. २२ लाख २८ हजार ५९३ रुपयांचा हप्ता भरण्यात आला. यात शेतकऱ्यांचा वाटा १९ लाख २ हजार ७८७ रुपये, राज्य व केंद्र सरकारचा वाटा प्रत्येकी १ लाख ६२ हजार ९०३ रुपये होता. १३ लाख ९१ हजार ९४८ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. ६५८ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
दरम्यान, पीकविमा तसेच सरकारच्या अन्य योजनांमुळे तरुण शेतीकडे वळत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. सासष्टीत जवळ जवळ दोन हजार हेक्टर जमीन नव्याने लागवडीखाली आल्याची नोंद विभागीय कृषी खात्याने घेतली आहे. बेतालभाटी येथील कोन्स्तान्सियो डिसिल्वा तसेच तेथील शेतकरी क्लबने व सुरावली येथील तानिया रिबेलो तसेच कृषी क्षेत्रामध्ये भरीव अशी प्रगती केली आहे.
कृषी खात्याने पंपसेट, ठिबक सिंचन (ड्रीप) व इतर सामुग्री शेतकऱ्यांना सवलतीत पुरविली. खात्याच्या योजनांचा फायदा घेऊन टिना रिबेलो यांनी सासष्टी व सांगेतही सूर्य फुलांची लागवड केली व निर्यातही केली आहे. गोव्यातही सूर्यफुलाचे पीक घेता येऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
योजनेला प्रतिसाद
कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो म्हणाले, शेतकरी आधार निधी योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची इच्छाशक्ती वाढली पाहिजे तसेच त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न घेता यावे यासाठी कृषी खात्याचे प्रयत्न चालू आहे.
शेतकरी आधार निधी
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण दिले जात आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई दिली जाते. दरम्यान, राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी शेतकरी आधार निधी योजनाही • राबवली आहे. योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. सर्वसमावेशक पीकविमा योजना राज्यात राबवली जात आहे.
१२५ शेतकऱ्यांना मिळाला लाभ
चालू मोसमात खरिपासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा १२५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. पिकांचा ६ लाख ४७ हजार ४४२ रुपयांचा विमा उतर विण्यात आला. एकूण १९,६४८ रुपयांचा हप्ता भरण्यात आला. यात शेतकऱ्यांचा वाटा १३,९९९ रुपये आणि राज्य व केंद्र सरकारचा वाटा प्रत्येकी ३,२२८ रुपये होता.
पीकविम्याचा पर्याय
शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, ढगाळ हवामान, कीड लागणे आदी संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. राज्यात तोक्त्ते वादळाच्या वेळी तसेच इतर अनेकदा पिकांची भरपूर हानी झाली. शेतकयांसाठी हा मोठा फटका होता. कित्येकदा तर शेती पिकांसाठी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकन्यांना या नैसर्गिक संकटापासून दिलासा देण्यासाठी सरकारने पीकविमा योजना सुरु केली आहे.