पणजी (नारायण गावस): गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसामुळे राज्यात थंडीचा गारवा गायब झाला असून कडाक्याचे ऊन पडत आहे. काही शहरांतील तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपच्या वर पाेहचला आहे. ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे.
गुलाबी थंडी गायब
राज्यात ऑक्टाेबर नंतर पाऊस ओसरल्यावर थंडीचा हंगाम सुरु हाेत असतो. नोव्हेंबर असाच उष्णतेत गेला पण डिसेंबर महिन्यात काही दिवस थंडीचा आस्वाद लोकांना घ्यायला मिळाला. पण आता जानेवारी सुरु हाेताच पुन्हा उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे पूर्वी लाेकांना जो थंडीचा आस्वाद मिळत होता तो आता नाहीसा झाला आहे. राजधानी पणजीत उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. तसेच इतर शहरांचा पाराही वाढत आहे. रात्रीच्यावेळीही जास्त थंडी नसते. वातावरणात दमट तसेच धव पडत असल्याने थंडी लागत नाही.
शेकोट्याही झाल्या गायब
शेकोट्याचा राहिल्या फक़्त आठवणी. ऐरव्ही नाेव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यात अनेक ठिकाणी शेकोटीला बसलेले लोक आम्हाला दिसत होते. काही वर्षांपूर्व तर डिसेंबर जानेवारीपर्यंत सकाळी रात्री जॅकेट घातल्याशिवाय बाहेर सरता येत नव्हते तसेच रात्रीच्या वेळी गोधडी कांबळ घेऊन झाेपावे लागत होते. पण आता ही थंडी मिळत नाही. पूर्वी घरा बाहेर लाेक शेकोट्या पेटवत होते त्या शेकोट्याही आता बंद पडल्या.
ग्रामिण भागातही उष्णतेचा फटका
पर्यावरण बदल पहायला मिळत आहे. शहरी भागात वाढते कॉँक्रेटीकरणामुळे उष्णता वाढली आहे. पण आता राज्यातील ग्रामिण भागातील थंडीही गायब झाली आहे. पूर्वी काणकोण, सत्तरी सारख्या डोंगराळ परिसरातील तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी लागत होती. आता या ग्रामिण भागातील थंडी गेली आहे. वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहे.
काजू आंब्यावर परिणाम
आता पुढील दोन महिन्यानंतर राज्यात काजू आंब्याचा हंगाम सुरु होणार आहे. पण मुबलक अशी थंडी काजू आंब्याच्या पिकाला मिळाली नाही तर या पिकावर त्याचा परिणाम जाणवू शकतो. सध्या दिवसभर उष्णता तसेच रात्री व सकाळी दव पडत असल्याने काजू आंब्याच्या पिकावर परिणाम हाेऊ शकतो. तसेच मधोमध पावसाच्या सरी पडत असल्याने काजूच झाडांना आलेला बहर कुजणार. त्यामुळे याचा शेती बागायतींप्रमाणे आरोग्यवर परिणाम जाणवणार.