- सदगुरू पाटीलपणजी : गोव्यात एकेकाळी मुंबईहून कुणी आले तर गोमंतकीयांकडून उत्साहाने स्वागत केले जात असे पण गोमंतकीय आता सावध झाले आहेत. मुंबईहून जे लोक गोव्यात येऊ लागले आहेत, त्यांच्यामुळे गोव्यात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने गोमंतकीय सतर्क बनले आहेत. गोवा सरकारही सचिंत बनले आहे. मुंबईहून आलेले पाचणांचे एक कुटूंब व त्यांचा एक चालक बुधवारी कोरोना पॉङिाटीव्ह सापडल्यानंतर गुरुवारी आणखी एक खलाशी कोरोनाग्रस्त आढळला. हा खलाशीही मुंबईहूनच टॅक्सीने गुरुवारी दुपारी गोव्यात दाखल झाला होता.
गोव्यात कोरोनाचे एकूण रुग्ण पंधरा झाले आहेत. त्यापैकी सात रुग्ण उपचारानंतर ठिक झाले. आता आठ रुग्ण आहेत. गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. कुठल्याच गोमंतकीयापासून दुस:या कुणाला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र जे बाहेरून येतात, तेच कोरोना घेऊन येतात अशा प्रकारचा निष्कर्ष आरोग्य खातेही काढू लागले आहे. मुंबईहून बुधवारी पाचजणांचे एक कुटूंब गोव्यात आले. त्यात दोन महिला व एक लहान मुलगी आहे. पाचहीजणांचा अहवाल कोरोना पॉङिाटीव्ह आला. त्यांचा चालकही कोरोनाग्रस्त आढळला. त्यांना मडगावच्या कोविद इस्पितळात दाखल केले गेले आहे.
गुरुवारी कोरोनाचा जो रुग्ण सापडला, तो मूळ गोमंतकीय आहे पण तो मुंबईत चौदा दिवस राहून गोव्यात आला. जलदगतीने केल्या जाणा:या ट्रनॅट चाचणीद्वारे तो गोव्यात पॉङिाटीव्ह सापडला. त्याच्याविषयीचा अंतिम अहवाल गोमेकॉ इस्पितळाच्या प्रयोगशाळेतून येणो बाकी आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी सांगितले. गुरुवारी टॅक्सीने रस्तामार्गे जो खलाशी गोव्यात आला, तो मुंबईत 3क् एप्रिल रोजी दाखल झाला होता. चौदा दिवसांपूर्वी त्याची कोविद चाचणी मुंबईत नकारात्मक आली होती. तो परवानगी घेऊन गोव्यात आला. गोव्यात त्याची चाचणी केली तेव्हा तो पॉङिाटीव्ह असल्याचे दिसून आले. आता दुस:यांदा त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली गेली आहे. त्याविषयीचा अहवाल मात्र अजून आलेला नाही.
दरम्यान, रेल्वेनेही गोव्यात मुंबई व अन्य ठिकाणहून लोक दाखल होऊ लागले आहेत. परप्रांतीय गोव्यात येऊ लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली व आपण ही चिंता केंद्रीय गृह मंत्रलय व केंद्रीय रेल्वे मंत्रलयालाही कळवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने याविषयीचा अभ्यास करण्याची ग्वाही दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.