पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: खोर्ली - जुने गोवे येथील डेक्कन फाईन केमिकल्स या कारखान्यात काम करताना मरण आलेल्या मृत कामगाराच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी कारखान्याबाहेर आंदोलन केले. कामगाराला काम करताना मरण आले, मात्र आता व्यवस्थापन जबाबदारी झटकत आहे. मृत कामगार हा घरातील एकमेव कमावता होता. त्यालाच मरण आल्याने कुटुंबाचे काय ? कंपनी व्यवस्थापन जो पर्यंत नुकसानभरपाईची मागणी पूर्ण करीत नाही तो पर्यंत काम बंद ठेवू असा इशारा कामगारांनी दिला.
डेक्कन फाईन केमिकल्स या कारखान्यात काम करताना क्रिसमोहर कट्टी (२५, उत्तर प्रदेश) याला मे महिन्यात मरण आले होते. जड वजन त्याच्या अंगार पडल्याने तो जागीच ठार झाला होता. मात्र कंपनीने कामगाराच्या मरणाची जबाबदारी झटकली. कट्टी याला दोन लहान मुले, पत्नी व आई वडिल आहेत. तो त्यांच्या कुटुंबाचा एकमेव कमावता व्यक्ती होता असे कामगारांनी यावेळी सांगितले.