ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३० : गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांचे व्यवहार पती-पत्नींप्रमाणो आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या पक्षातील दोषी नेत्यांचे हितसंबंध जपत आहेत. म्हणूनच एसईङोडप्रश्नी काँग्रेसमधील दोषी नेत्यांविरुद्ध सरकार काहीच कारवाई करत नाही, अशी टीका आपचे ज्येष्ठ पदाधिकारी दिनेश वाघेला यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
आपचे अॅश्ली रोझारिओ हेही यावेळी उपस्थित होते. सेझ कंपन्यांना गोव्याच्या जमिनी कवडीमोल दराने काँग्रेस सरकारच्या काळात दिल्या गेल्या होत्या. त्याची चौकशी करून 3क् दिवसांत भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून अहवाल मिळवू, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी विधानसभेत सांगितले होते. प्रत्यक्षात काही महिने झाले तरी, अजुनही अहवाल आलेला नाही. उलट सरकार न्यायालयाबाहेर चर्चेद्वारे सेझच्या जमिनींचा विषय सोडविताना सेझ कंपन्यांना 2क् टक्के जमीन देऊ पाहत आहे. 38 लाख चौ.मी. जमिनीपैकी वीस टक्के म्हणजे 7 लाख चौ.मी. म्हणजे 15 हजार कोटींची जमीन सरकार सेझ कंपन्यांना अगदी कवडीमोल दराने देणार आहे. हा भ्रष्टाचार आहे, असे वाघेला म्हणाले.
सेझ कंपन्या व दोषी राजकारण्यांविरुद्ध भाजप सरकार कारवाई करू पाहत नाही. केवळ गोमंतकीयांची फसवणूक करत आहे. उलट आम्हाला हे पक्ष एकमेकाची बी टीम म्हणत आहे. माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत सेझ घोटाळ्य़ाचा विषय उपस्थित केला होता, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपण 3क् दिवसांत एसीबीकडून अहवाल घेईन व त्यानुसार कारवाई सुरू करीन असे सांगितले होते हे वाघेला यांनी नमूद केले. 35 हजार कोटींच्या खनिज घोटाळ्य़ाद्वारे झालेली लुट व अन्य प्रकरणांबाबतही भाजप सरकारने काहीच केले नाही. केवळ कारवाईचे इशारे दिले व त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चा विरोधी पक्षनेस्तनाबूत व निस्तेज करून ठेवला. विरोधी पक्षनेते व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी स्वत:ची तोंडे नेहमी शिवलेली ठेवली, असे वाघेला म्हणाले.