पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूडच्या सिने ता:यांना भेटण्यास व त्यांच्यासोबत सेल्फीसाठी खूप वेळ आहे पण गोव्यातील खनिज खाण अवलंबित काकुळतीला आलेले असताना व गेले अकरा महिने ते भेटीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यासाठी मात्र पंतप्रधानांकडे वेळ नाही, असा टोला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी लगावला आहे.
गोव्याच्या खनिज खाणी गेल्यावर्षी बंद झाल्या व मोठय़ा संख्येने लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला. गेले अनेक महिने गोवा खनिज अवलंबितांकडून आंदोलन केले जात आहे. खाण अवलंबितांची संघटना आंदोलन करत यापूर्वी दिल्लीर्पयत गेली. तीन दिवस खाण अवलंबितांनी दिल्लीत धरणो आंदोलन केले होते पण केंद्र सरकारने त्या आंदोलनाची दखल घेतली नाही. भाजपचे कुणीच केंद्रीय नेते तेव्हा अवलंबितांसमोर गेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांची आम्हाला भेट घ्यायची आहे असे खाण अवलंबितांच्या नेत्यांनी गोव्यातील भाजपचे खासदार, आमदार, मंत्र्यांना सांगून पाहिले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही सांगितले पण मोदी यांची भेट खाण अवलंबितांना अजून मिळालेली नाही. यामुळे खाण अवलंबितांनी खासदारांच्या घरासमोरही आंदोलन सुरू केले. तसेच येत्या दि. 16 र्पयत जर मोदी यांची भेट मिळाली नाही तर गोवा- बेळगाव महामार्ग रोखू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. याची दखल घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी 13 रोजी खाण अवलंबितांच्या नेत्यांना भेटण्यासाठी बोलावले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान व शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील नाहीत. त्यांनी बैठकीसाठी बोलावले पण गेले अकरा महिने मोदी यांना गोव्यातील खाण अवलंबितांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही, बॉलिवूडच्या अभिनेत्यांना मात्र भेटण्यास व सेल्फी काढण्यास त्यांच्याकडे खूप वेळ आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.