शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गोव्यात मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 8:26 PM

मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाही. ते गोव्यात परतले तरी प्रशासन अजूनही ठप्प आहे, असा दावा क रीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

पणजी : मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाही. ते गोव्यात परतले तरी प्रशासन अजूनही ठप्प आहे, असा दावा क रीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजारी असूनही काम करणे हे आत्महत्त्या करण्यासारखेच आहे. भाजप सहानुभूतीचे राजकारण करीत आहे. पर्रीकर यांना या पदावरुन मोकळीक देण्यास बहुधा भाजप तयार नाही. पर्रीकर हे आज मुख्य सचिवासारखे एखाद्या प्रशासकीय अधिकाºयाप्रमाणे काम करीत आहेत. ते केवळ कार्यालयात बसून फाइल्स हाताळतात. राजकीय नेत्याप्रमाणे त्यांना लोकांमध्ये मिसळताही येत नाही किंवा त्यांच्याशी संवादही साधता येत नाही. या स्थितीत राज्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.’पर्रीकर यांना वैद्यकीय फिटनेस दाखला कोणी दिला, असा सवाल करुन चोडणकर म्हणाले की, साधा कर्मचारी आजारी रजेवर जातो तेव्हा त्यालादेखिल कामावर रुजू होताना फिटनेस दाखला सादर करावा लागतो. पर्रीकरांच्या बाबबीत आजार नेमका काय याबाबत सर्वांना अंधारात ठेवण्यात आले. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला नेण्यात आले याचा अर्थ त्यांना गंभीर आजार जडलेला आहे आणि त्यांनी आरोग्यावरच लक्ष देणे अधिक संयुक्तिक आहे. पर्रीकर यांच्याबाबतीत भाजप सहानुभूतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप करताना चोडणकर म्हणाले की, उपचारार्थ मुंबईतील इस्पितळात असताना पर्रीकर यांना अर्थसंकल्प मांडण्यासाठी गोव्यात आणण्यात आले. त्यानंतरच त्यांचा आजार अधिक बळावला. आजारी असूनही पर्रीकर मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर काम करतात ही चिंतेचे बाब आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री आजारी असल्याने या मंत्र्यांच्या खात्यांचा भारही पर्रीकरांवर पडला आहे. आज ५0 पेक्षा अधिक खाती ते हाताळत आहे. ही गोष्ट ताण-तणावाचीच असून पर्रीकर हे या खात्यांना न्याय देऊ शकणार नाही. पूर्वीच्या तुलनेत ते २0 ते ३0 टक्केही काम करीत नाहीत. चोडणकर म्हणाले की,‘गृह खाते अस्तित्त्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. पिसुर्ले कॅटामाइन प्रकरणी केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाºयांना येथे येऊन धाड टाकावी लागते. राज्यातील गृह यंत्रणा मात्र सुस्त आहे. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत तीन महिने राज्याची पीछेहाट झाली. आता आणखी अधिक काळ सहानुभूती आणि संयम दाखवणे शक्य नाही’.पर्रीकर सरकार कसिनोमालकांचे चोचले पुरवित असल्याचा आरोप करताना चोडणकर म्हणाले की,‘ कसिनोंकडून सरकारला पैसा मिळतो आणि त्याबदल्यात सरकार त्यांचे लाड पुरविते’.    ‘कामकाजाचे दिवस वाढवा’आगामी विधानसभा कामकाजाचे दिवस अत्यल्प असल्याचा दावा चोडणकर यांनी केला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाने कामकाजाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. कामकाज सल्लागार समितीसमोर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर या मागणीचा पाठपुरावा करतील, असे ते म्हणाले. राज्यात अनेक प्रश्न भेडसावत आहेत. विधानसभा अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे.