शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

Congress: अखेर गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार फुटले, फुटीर विधिमंडळ गट भाजपात प्रवेश करणार

By किशोर कुबल | Published: September 14, 2022 10:50 AM

Goa Congress: काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला आहे.

- किशोर कुबलपणजी : काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला आहे. सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने आठजणांचा हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना सादर करण्यात येईल.

केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमांव,  हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा वगळता अकरापैकी अन्य आठ काँग्रेसचे आमदार सभापतींच्या कार्यालयात सकाळीच १० वाजताच पोहोचले.काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले आहेत. यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. संकल्प हे सुरुवातीपासून आपण  काँग्रेसकडे निष्ठावान असल्याचे दाखवत होते. परंतु आता ते फुटीर गटाबरोबर आहेत.

फुटीर गटांमध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाBJPभाजपा