पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:17 AM2019-01-27T04:17:37+5:302019-01-27T04:18:00+5:30

सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे.

Congress government in Goa after seat-sharing; State President's Claims | पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

Next

पणजी : सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवाकाँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमधील पाच आमदार आमच्या संपर्कात असून ते काँग्रेसला सरकार स्थापण्यात मदत करतील, असे ते म्हणाले. दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी येत्या दोन महिन्यात ते शक्य होईल. आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर हे आमदार काँग्रेसला समर्थन देतील, असे चोडाणकर यांनी म्हटले. गोवा विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १२ आमदार आहेत. गेल्यावर्षी मे मध्ये काँग्रेसने कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीचे उदाहरण देत सरकार स्थापण्याचा दावा केला होता. फेब्रुवारी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला राज्यपालांनी सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले नव्हते. या पक्षाने सप्टेंबर २०१८ मध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पुन्हा निवेदन देत सरकार स्थापण्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्यामुळे काँग्रेसने पर्यायी सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती.

Web Title: Congress government in Goa after seat-sharing; State President's Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.