पणजी : दिल्लीतील बंद वातानुकूलित खोलीत डोळे बंदकरून बसलेल्या काँग्रेस हायकमांडने गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या कार्याची दखल घेतली नाही, अशी टीका काँग्रेसच्या माजीप्रभारी आणि माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी रविवारी केली. डॉ. डिसोझा यांच्यावरील पुस्तक प्रकाशनासाठी त्या पणजीत आल्या असता त्यांनी काँग्रेस हायकमांडला ‘रुटलेस वंडर’ असे संबोधले. पुस्तक प्रकाशन सोहळ््यानिमित्त चर्चासत्रात बोलताना अल्वा यांनी डिसोझा यांच्या कार्याची दखल न घेतल्याबद्दल काँग्रेस हायकमांडवर टीका केली. काँग्रेसच्या गोव्यातील प्रभारी असताना आपण स्वत: त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु आपले प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. दिल्लीतील वातानुकूलित खोलीच्या बंद दरवाज्याप्रमाणेच त्यांचे डोळेही बंदअसावेत, असा टोमणाही त्यांनी हाणला. प्रत्यक्ष कुणाही व्यक्तीचे नाव न घेता काँग्रेस हायकमांडवर हल्ला चढविताना त्यांनी सांगितले की, (पान २ वर)
काँग्रेस हायकमांड ‘रुटलेस वंडर’
By admin | Published: May 18, 2015 1:53 AM