आठ जणांचा काँग्रेस विधिमंडळ गट, भाजपात विलीन करण्याचा ठराव, आमोणकर यांचा दावा

By किशोर कुबल | Published: September 14, 2022 12:21 PM2022-09-14T12:21:04+5:302022-09-14T12:22:02+5:30

आठ आमदार एकत्र आल्यानंतर विधिमंडळ गटाने ठराव घेतला असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

Congress legislature group of eight, resolution to merge with BJP, Sankalp Amonkar's claim | आठ जणांचा काँग्रेस विधिमंडळ गट, भाजपात विलीन करण्याचा ठराव, आमोणकर यांचा दावा

आठ जणांचा काँग्रेस विधिमंडळ गट, भाजपात विलीन करण्याचा ठराव, आमोणकर यांचा दावा

Next

पणजी : काँग्रेस विधिमंडळ गटाची अधिकृत बैठक होऊन विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे, असे फुटीर गटातील आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

४० सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेसचे ११ आमदार असून अपात्रता टाळण्यासाठी दोन- तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. आठ आमदार एकत्र आल्यानंतर विधिमंडळ गटाने ठराव घेतला असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

आमोणकर हे विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते आहेत. तर मायकल लोबो हे विरोधी पक्ष नेते होते. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसचे आमदारांना फोडण्याचे भाजपचे 'ऑपरेशन लोटस' फसल्यानंतर लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून दूर करण्यात आले होते.

Web Title: Congress legislature group of eight, resolution to merge with BJP, Sankalp Amonkar's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.