“पक्षाचे काम वाढविणे ही प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीच”; माणिकराव ठाकरे स्पष्टच बोलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 09:54 AM2024-09-23T09:54:39+5:302024-09-23T09:56:32+5:30

राज्यातील सर्व मतदारसंघांत काँग्रेसची संघटना वाढविण्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या विधानाला माणिकराव ठाकरे यांनी समर्थन दिले आहे.

congress manikrao thackeray said it is responsibility of regional president to increase the work of the party | “पक्षाचे काम वाढविणे ही प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीच”; माणिकराव ठाकरे स्पष्टच बोलले

“पक्षाचे काम वाढविणे ही प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीच”; माणिकराव ठाकरे स्पष्टच बोलले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत काँग्रेसची संघटना वाढविण्याच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या विधानाला राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी समर्थन दिले आहे. पाटकर योग्य तेच बोलले आहेत, असे ते म्हणाले.

पाटकर यांनी पक्ष संघटना वाढविण्यासंबंधी वक्तव्य केले होते. पक्षाचे काम वाढविणे, संघटना अधिक बळकट करणे ही कामे अग्रक्रमाने घेतली जातील, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर आम आदमी पार्टीने टीका केली होती. त्यावर काँग्रेसचे प्रभारी ठाकरे म्हणाले की पक्षाचे काम वाढविणे ही प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीच आहे. सर्वच पक्षांना आपले काम वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पाटकर काहीच चुकीचे बोलले नाहीत.

 

Web Title: congress manikrao thackeray said it is responsibility of regional president to increase the work of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.