लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र करण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे निर्देश राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गोवा सरकारला दिल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्र्यांनी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना पत्राद्वारे दिली आहे.
या पत्रात केंद्रीयमंत्री म्हणतात की, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण कायद्यानुसारच हा विषय हाताळणार आहे. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. हायकोर्टाने याआधी तीन महिन्यात म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी अधिसूचना काढण्यास राज्य सरकारला बजावले होते. परंतु सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याने हायकोर्टात अवमान याचिका आहे.