पणजी : गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारे केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हेही याबाबत केंद्राच्या संपर्कात आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे झालेल्या भाजपाच्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी सांगितले. विरोधी काँग्रेस पक्ष सध्या मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी राजकारण करत आहे, अशीही टीका शहा यांनी केली.
कुजिरा- बांबोळी येथील सॅगच्या स्टेडियमवर हजारो भाजप कार्यकत्र्याना शहा यांनी मार्गदर्शन केले. लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी कार्यकत्र्याना केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, मंत्री विश्वजित राणो, माविन गुदिन्हो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो आदी व्यासपीठावर होते.
शहा म्हणाले, की गोव्यातील खाणप्रश्नाविषयी आम्हाला चिंता आहे. विशेषत: मुख्यमंत्री र्पीकर यांनाही चिंता आहे. सर्व पद्धतीने तो प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी हे कोणतीच पूर्वसूचना न देता नुकतेच र्पीकर यांना भेटून गेले. त्यांना र्पीकर यांच्या आरोग्याविषयी विचारपुस करण्यासाठी यायचे होते असे वाटले व आम्हाला त्याविषयी बरे वाटले पण गांधी यांनी त्याच सायंकाळी र्पीकर यांच्याशी राफेलबाबत चर्चा झाली असल्याचे जाहीर करून खूप खालच्या स्तरावरील राजकारण केले. गांधी खोटे बोलले.
शहा म्हणाले, की र्पीकर त्यांच्या आजाराविरुद्ध लढत आहेत पण काँग्रेस पक्ष राजकीय डाव खेळतोय. र्पीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री होते. पंतप्रधान मोदी व र्पीकर यांनी देशाच्या सुरक्षेची काळजी घेतली. सर्जिकल स्ट्राईकनंतर शत्रूराष्ट्रांची व पूर्ण जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली. केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार आल्यानंतर बॉम्बस्फोट करणा:या घुसखोरांना वेचून शिक्षा केली जाईल. केंद्रात काँग्रेसचे राज्य होते तेव्हा गोव्याला फक्त पाच हजार कोटींची मदत मिळाली होती पण मोदी सरकारने 15 हजार कोटींचे प्रकल्प दिले, शिवाय अन्य ब:याच कोटींच्या योजना मिळून गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात पाच वर्षात पस्तीस हजार कोटी रुपये खर्च केले. मांडवी, जुवारीच्या पुलांसह खांडेपार, गालजीबाग तळपण असे अनेक पुल दिले. मोपा विमानतळही उभा राहणार आहे.
शहा म्हणाले, की देशातील विरोधकांना केंद्रात मजबूत सरकार नको. मायावतींना तर मजबूर सरकार हवे आहे. महागठबंधनाला जर चुकून सत्ता मिळाली तर रोज एक नेता पंतप्रधान बनेल. महागठबंधनाला तुमचा नेता कोण असे मतदारांनी विचारावे. त्यांच्याकडे नेताही नाही व नीतीही नाही.
अन् पर्रीकरांनी केले भाष्यशहा यांच्यासोबतच मुख्यमंत्री र्पीकर व्यासपीठावर आले. कार्यकत्र्यानी त्यावेळी जोरदार टाळ्य़ा वाजवून र्पीकर यांचे स्वागत केले. र्पीकर यांना डॉ. कोलवाळकर व इतरांनी व्यासपीठावर आणले. र्पीकर खुर्चीवर बसले. तुम्ही बोलणार आहात काय असे शहा यांनी र्पीकर यांना विचारले. र्पीकर यांनी होय म्हणताच र्पीकर जिथे बसले होते, तिथे माईक दिला गेला. तीन-चार मिनिटे र्पीकर बोलले. त्यांचा आवाज सुधारला आहे. आपण यावेळी जास्त बोलत नाही, मोठी भाषणो आपण प्रत्यक्ष निवडणुकीवेळी करण्यासाठी राखून ठेवली आहेत, असे र्पीकर म्हणाले. प्रत्येकाने छोटे मतभेद वगैरे विसरावेत व एकजुटीने लोकसभा निवडणुकीवेळी काम करावे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी सर्व कार्यकत्र्यानी वावरावे, असे आवाहन र्पीकर यांनी केले.श्रीपाद नाईक, तेंडुलकर व इतरांची भाषणो झाली. दामू नाईक यांनी सुत्रनिवेदन केले. वंदे मातरमने सांगता झाली