सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 01:05 PM2024-10-10T13:05:41+5:302024-10-10T13:06:14+5:30

इतके होऊनही मुख्यमंत्री व पोलिस खाते गप्प कसे काय? वेलिंगकर हे RSSचे माजी संघचालक आहेत. त्यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा आहे.

congress questions goa govt hand in hand with subhash velingkar, does not it help in hiding | सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भुतानी व जुआरी जमीन घोटाळा या महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष वळविण्यासाठी धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. सुभाष वेलिंगकर यांच्याशी सरकारची हातमिळवणी असून, तेच वेलिंगकरांना लपण्यासाठी मदत तर करीत नाहीत ना? असा सवाल काँग्रेसच्या सह प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. 

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वेलिंगकरांनी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे गोव्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेस सुध्दा या आंदोलनात उतरले. मात्र इतके होऊनही मुख्यमंत्री व पोलिस खाते गप्प कसे काय? वेलिंगकर हे आरएसएसचे माजी संघचालक आहेत. त्यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की जमीन भू- रुपांतर, डॉगरफोड आदी विषयांवरील लक्ष वळवण्यासाठी भाजप सरकारने वेलिंगकरांचा विषय तयार केला आहे. 

यावेळी दक्षिण गोवा खासदार कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव व हळदोणेचे आमदार अॅड. कार्ल्स फरेरा उपस्थित होते.

 

Web Title: congress questions goa govt hand in hand with subhash velingkar, does not it help in hiding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.